10th Pass Government Job : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक महत्त्वाची आणि अतिशय गोड बातमी समोर आली आहे. सेंट्रल इंस्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनीअरिंग अॅण्ड टेक्नोलॉजी या संस्थेत एक पदभरती निघाली आहे. या अंतर्गत या संस्थेतील रिक्त पदांची भरती केली जाणार आहे.
यासाठीची अधिसूचना संबंधित संस्थेच्या माध्यमातून निर्गमित करण्यात आली आहे. विशेष असे की या संस्थेत निघालेल्या या भरतीसाठी दहावी पास उमेदवार पात्र राहणार आहेत. यामुळे जर तुम्हीही दहावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी ही सुवर्णसंधी राहणार आहे.
जर तुम्ही या भरतीसाठी इच्छुक असाल तर आजची ही बातमी शेवटपर्यंत नक्कीच वाचा. आज आपण या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदासाठी होणार भरती?
सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या संस्थेने निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार या संस्थेत प्रशिक्षणार्थी अर्थातच ट्रेनीं या पदाच्या रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
किती जागांसाठी होणार भरती
सेंट्रल इन्स्टिट्यूट ऑफ पेट्रोकेमिकल्स इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी म्हणजे केंद्रीय पेट्रोकेमिकल्स अभियांत्रिकी आणि तंत्रज्ञान या संस्थेत मशीन ऑपरेटर प्लास्टिक प्रोसेसिंग या पदासाठी प्रशिक्षणार्थीच्या 60 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
मिळालेल्या माहितीनुसार, या पदासाठी दहावी पास उमेदवार पात्र राहणार आहेत. मात्र उमेदवाराने मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.
आवश्यक वयोमर्यादा
या भरतीसाठी 18 ते 28 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत. तसेच एससी, एसटी आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार सूट दिली जाणार आहे. अधिसूचनेनुसार एस सी आणि एसटी प्रवर्गातील उमेदवारांना 5 वर्षाची आणि ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षाची वयोमर्यादित सुट राहणार आहे.
नोकरीचे ठिकाण कोणते
या भरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना चंद्रपूर, यवतमाळ, नागपूर येथे नोकरीसाठी पाठवले जाणार असल्याचे सांगितले जात आहे.
अर्ज कसा करावा लागणार
या भरती प्रक्रियेसाठी ऑनलाइन पद्धतीने इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज विहित मुदतीत सादर करण्याचे आवाहन केले जात आहे. https://www.cipet.gov.in/ या लिंक वर जाऊन इच्छुक अन पात्र उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाईन सादर करता येणार आहे.
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक
या भरतीसाठी इच्छुकांना दोन सप्टेंबर 2023 पर्यंत ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. विहित कालावधीतच इच्छुकांनी अर्ज करायचा आहे. विहित कालावधीनंतर अर्ज करता येणार नाही.