10वी पास उमेदवारांसाठी नोकरीची संधी ! वेस्टर्न कोलफील्डमध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, इथं अर्ज करा

10th Pass Job : जर तुम्हीही दहावी पास असाल आणि नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. हे अपडेट दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी विशेष खास राहणार आहे.

कारण की, दहावी आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवारांसाठी वेस्टर्न कोलफील्डमध्ये काही रिक्त जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना देखील वेस्टर्न कोलफील्डकडून जारी करण्यात आली आहे.

याअंतर्गत पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. अशा स्थितीत आज आपण या पदभरतीबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदासाठी होणार भरती

वेस्टर्न कॉलफील्डने काढलेल्या अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रिया अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

किती जागांसाठी होणार भरती

या अंतर्गत अप्रेंटिसच्या 875 जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुकांनी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करायचा आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

या पदासाठी दहावी पास आणि आयटीआय उत्तीर्ण उमेदवार पात्र राहणार आहेत. तथापी, शैक्षणिक पात्रतेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिसूचना वाचणे आवश्यक आहे.

आवश्यक वयोमर्यादा

या भरतीसाठी 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत. म्हणजेच 18 वर्षांपेक्षा कमी आणि 25 वर्षांपेक्षा अधिक वयाचे उमेदवार या भरतीसाठी अपात्र राहतील.

अर्ज कसा करायचा आहे

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. http://103.59.142.228:8081/Apprenticeship या लिंकवर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज विहित कालावधीमध्ये सादर करता येणार आहे.

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक

इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज 16 सप्टेंबर पूर्वी सादर करायचा आहे. 16 सप्टेंबर 2023 ही अर्ज करण्याची शेवटची दिनांक आहे.

जाहिरात कुठे पाहणार?

http://www.westerncoal.in/images/notice_trade_appr_49-20223.pdf या लिंक वर जाऊन तुम्हाला या भरतीची सविस्तर जाहिरात पाहता येईल. 

Leave a Comment