12th Pass Job : आपल्या देशात सरकारी नोकरीची इच्छा असलेल्या तरुणांची संख्या खूपच अधिक आहे. आपल्या राज्यातही अशा तरुणांची संख्या विशेष उल्लेखनीय आहे. राज्यातील अनेकांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा आहे. यासाठी तरुण वर्ग खूप मेहनत घेतोय.
तरुण-तरुणी सरकारी नोकरीसाठी दिवसाची रात आणि रात्रीचा दिवस करत आहेत, खूप अभ्यासही करत आहेत. जर तुम्हीही अशाच तरुण-तरुणींपैकी एक असाल आणि सरकारी नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे.
भारतीय लेखापरीक्षण आणि लेखा विभाग म्हणजे CAG मध्ये एक मोठी भरती निघाली आहे. यासाठीची अधिसूचना देखील नुकतीच निर्गमित करण्यात आली आहे. या विभागात तब्बल 1773 रिक्त जागांसाठी भरती काढण्यात आली आहे.
या रिक्त पदांसाठी पात्र आणि इच्छुक उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती बाबत सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या रिक्त पदांसाठी होणार भरती?
सदर अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार या पदभरती अंतर्गत प्रशासकीय सहाय्यक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
किती रिक्त पदांसाठी होणार भरती
भारतीय लेखा परीक्षण आणि लेखा विभाग येथे प्रशासकीय सहाय्यक या पदाच्या एकूण 1,773 रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक अहर्ता
सदर अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठातून बॅचलर पदवी/ बारावी किंवा समतुल्य उमेदवार पात्र राहणार आहेत. तथापि शैक्षणिक पात्रते संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना वाचणे आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा लागणार
या पदासाठी जे उमेदवार पात्र अन इच्छुक असतील त्यांना ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन केले जात आहे. श्री नीलेश पाटील, सहाय्यक. C&AG (N)-I, O/o the C&AG ऑफ इंडिया, 9, दीनदयाल उपाध्याय मार्ग, नवी दिल्ली- 110124 हा अर्ज पाठवण्याचा पत्ता आहे. या पत्त्यावर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज विहित कालावधीमध्ये पाठवायचा आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक
या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 17 सप्टेंबर 2023 पर्यंत आपला अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे. इथे एक गोष्ट लक्षात ठेवा की विहित कालावधीनंतर जे अर्ज येतील त्या अर्जावर कोणत्याही परिस्थितीत विचार होणार नाही. यामुळे इच्छुक उमेदवारांनी लवकरात लवकर या पदासाठी अर्ज सादर करायचा आहे.
जाहिरात कुठे पाहणार ?
https://drive.google.com/file/d/1-zl9T1QAg-gtToQpaeQM261xYH_ggKOL/view या लिंक वर जाऊन या पदभरतीची जाहिरात पीडीएफ स्वरूपात पाहता येणार आहे.