10वी, 12वी पास उमेदवारांसाठी एअर इंडियात निघाली भरती ! ‘या’ रिक्त पदांच्या जागा भरल्या जाणार, अर्ज कुठं करणार?

Air India Recruitment 2023 : देशभरातील हजारो तरुण-तरुणी नोकरीचे स्वप्न उराशी बाळगून आहेत. अशा नोकरीचे स्वप्न पाहणाऱ्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. ती म्हणजे एअर इंडिया मध्ये नुकतीच एक नवीन भरती निघाली आहे.

या 2023 च्या नवीन भरती अंतर्गत एअर इंडिया मध्ये विविध रिक्त पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. यासाठीची अधिसूचना एअर इंडियाने नुकतीच निर्गमित केली आहे. सदर अधिसूचनेनुसार एअर इंडिया मध्ये तब्बल 998 रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे.

यासाठी उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन केले जात आहे. दरम्यान आज आपण या पदभरतीचे स्वरूप थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. या भरती प्रक्रिया अंतर्गत किती अन कोणत्या पदांसाठी भरती होणार, अर्ज कुठे करायचा, अर्ज करण्याची अंतिम दिनांक, शैक्षणिक पात्रता याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.

कोणत्या आणि किती पदांसाठी होणार भरती

एअर इंडियाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार एअर इंडिया मध्ये हँडीमॅन आणि युटीलिटी एजंट च्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या भरती प्रक्रियेच्या माध्यमातून हँडीमॅन पदाच्या रिक्त असलेल्या 971 जागा भरल्या जाणार आहेत.

तसेच युटिलिटी एजंट (पुरुष) या पदाच्या वीस रिक्त जागा भरल्या जाणार आहेत युटिलिटी एजंट महिला या पदाच्या सात रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. म्हणजे एअर इंडिया मध्ये विविध पदाच्या एकूण 998 रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरण्याचे नियोजन आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

वर नमूद केलेल्या पदासाठी दहावी आणि बारावी पास उमेदवार पात्र राहणार आहेत. याबाबत अधिक ची माहिती जाणून घेण्यासाठी संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आलेली अधिसूचना वाचणे आवश्यक आहे.

अर्ज कुठे करावा लागणार

या भरतीसाठी एअर इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करावा लागणार आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी यासाठी विहित कालावधीमध्ये अर्ज सादर करायचा आहे.

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 18 सप्टेंबर 2023 पर्यंत आपला अर्ज सादर करता येणार आहे.

Leave a Comment