बँक ऑफ बडोदामध्ये निघाली भरती ! मुंबईच्या शाखेतील ‘या’ रिक्त पदांसाठी होणार भरती, पदवीधर उमेदवार राहणार पात्र

Bank Of Baroda Recruitment : बँकेत नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषता मुंबईत बँकेची नोकरी शोधणाऱ्या उमेदवारांसाठी ही बातमी खूपच खास राहणार आहे.

कारण की, बँक ऑफ बडोदा अंतर्गत येणाऱ्या बँक ऑफ बडोदा फायनान्शिअल सोल्युशन लिमिटेड मुंबई येथे विविध रिक्त पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. यामुळे जे उमेदवार बँकिंग एक्झामसाठी तयारी करत असतील त्यांच्यासाठी ही नोकरीची सुवर्णसंधी राहणार असे बोलले जात आहे.

दरम्यान बीओबी फायनान्शिअल सोल्युशन्स लिमिटेड कडून यासाठीची अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. या अधिसूचनेत भरती प्रक्रिया अंतर्गत भरल्या जाणाऱ्या रिक्त जागांचा तपशील, एज्युकेशनल क्वालिफिकेशन, वयोमर्यादा, अर्ज करण्याची पद्धत इत्यादी बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.

तसेच या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. दरम्यान आज आपण या भरतीची अधिसूचना थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

जाहिरातीत दिलेल्या माहितीनुसार BOB फायनान्शियल सोल्युशन लिमिटेड मुंबई येथे रिजनल रिलेशन ऑफिसर आणि डेप्युटी रिजनल रिलेशन ऑफिसर या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

किती पदांसाठी होणार भरती?

या भरती प्रक्रिया अंतर्गत रीजनल रिलेशन ऑफिसर आणि डेप्युटी रिजनल रिलेशन ऑफिसर या पदाच्या रिक्त असलेल्या 20 जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

रिजनल रिलेशन ऑफिसर या पदासाठी पदव्युत्तर पदवी + रिटेल असेट्स आणि क्रेडिट कार्ड मध्ये काम करण्याचा किमान एका वर्षाचा अनुभव असलेला उमेदवार पात्र राहणार आहे. किंवा पदवी + तीन वर्षाचा रिटेल असेट्स आणि क्रेडिट कार्ड मध्ये कामाचा अनुभव असलेला उमेदवार पात्र राहणार आहे.

डेप्युटी रिजनल रिलेशन ऑफिसर या पदासाठी पदवी + रिटेल असेट्स आणि क्रेडिट कार्ड मध्ये कामाचा एक वर्ष अनुभव असलेला उमेदवार पात्र राहणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार ?

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज सादर करायचा आहे. https://bobfinancial.turbohire.co/job/publicjobs/tH%2FT4Y3ITD2Ea2fl3wVL__msN4hpJ_MJTF2mspObvFpJke2VoVPPy6LvgSF1Ckot या लिंक वर जाऊन इच्छुक उमेदवार आपला अर्ज सादर करू शकतात.

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक

या भरतीसाठी 14 सप्टेंबर 2023 पर्यंत इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज वर दिलेल्या संकेतस्थळावर जाऊन सादर करता येणार आहे. अर्ज विहित कालावधीत सादर करायचा आहे. विहित कालावधीनंतर कोणत्याही सबबीवर अर्ज सादर करता येणार नाही.

जाहिरात कुठे पाहणार

https://drive.google.com/file/d/1GxD-HGylFHe0afDcM7c6UbUVpYHFUZ-D/view?usp=drivesdk या लिंक वर जाऊन या भरतीची जाहिरात पाहता येणार आहे.

Leave a Comment