Bank Of Maharashtra : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची बातमी समोर येत आहे. जे तरुण बँकेच्या भरती परीक्षेसाठी तयारी करत असतील अशा तरुणांसाठी ही बातमी विशेष खास राहणार आहे. कारण की राज्यातील एका महत्त्वाच्या बँकेत काही रिक्त पदांसाठी भरती काढण्यात आली आहे.
बँक ऑफ महाराष्ट्र या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या बँकेत ही भरती निघाली आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत बँक ऑफ महाराष्ट्र मधील रिक्त पदे भरली जाणार आहेत. याची अधिसूचना बँक ऑफ महाराष्ट्रकडून निर्गमित करण्यात आली आहे.
या अधिसूचनेत दिलेल्या पात्रतेत खऱ्या उतरणाऱ्या इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यासाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
या पदासाठी होणार भरती
बँक ऑफ महाराष्ट्रने काढलेल्या अधिसूचनेनुसार, या पदभरती अंतर्गत चीफ कम्पलायन्स ऑफिसर म्हणजेच मुख्य अनुपालन अधिकारी या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
किती पदांसाठी होणार भरती
बँक ऑफ महाराष्ट्र शिवाजीनगर पुणे येथील ब्रांच मध्ये रिक्त असलेले एक पद या भरती अंतर्गत भरले जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
या पदासाठी पदवीधर उमेदवार पात्र राहणार आहेत. मात्र सदर उमेदवाराकडे पीएच.डी./एमबीए/एलएलएम/सीए/सीएमए/सीएस/सीएफए किंवा डिप्लोमा/डिग्री इन कम्प्लायन्स अँड एथिक्स किंवा या समकक्ष यांसारखी अतिरिक्त पदव्युत्तर पदवी असणे गरजेचे आहे.
अर्ज कसा करायचा
यासाठी ऑफलाइन अर्ज करायचा आहे. बँक ऑफ महाराष्ट्र, एचआरएम विभाग, मुख्य कार्यालय, लोकमंगल, 1501, शिवाजीनगर, पुणे 4114005 या पत्त्यावर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज विहित कालावधीत पाठवायचा आहे.
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक
या भरतीसाठी 16 सप्टेंबर 2023 पर्यंत इच्छुकांना आपला अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर सादर करता येणार आहे.