बँकेत नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी सुवर्णसंधी ! 3 हजार 49 जागांसाठी निघाली मेगाभरती, पदवीधर उमेदवार राहणार पात्र, पहा जाहिरात

Banking Jobs : नोकरी शोधणाऱ्या तरुणांसाठी विशेषता ज्या तरुणांना बँकेत काम करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. विशेषतः सरकारी बँकांमध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्यांसाठी ही एक मोठी अपडेट राहणार आहे.

आयबीपीएसने नुकतीच प्रोबेशनरी ऑफिसर्स पदासाठी मेगा भरती काढली आहे. याची अधिसूचना आयबीपीएसने नुकतीच प्रकाशित केली आहे.

या अधिसूचनेनुसार, या पदभरतीच्या माध्यमातून 3,049 जागा आयबीपीएसकडून भरल्या जाणार आहेत. अशा परिस्थितीत, आज आपण आयबीपीएसने काढलेल्या या भरतीबाबत थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

IBPS ने काढलेल्या अधिसूचनेनुसार प्रोबेशनरी ऑफिसर्स (PO) / मॅनेजमेंट ट्रेनीं (MT) या पदासाठी ही भरती राहणार आहे.

किती पदांसाठी होणार भरती?

आयबीपीएस तब्बल 3 हजार 49 रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता?

या पदासाठी कोणत्याही शाखेतील पदवीधर पात्र राहणार आहेत. मात्र मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेतून पदवी प्राप्त उमेदवारच यासाठी अर्ज करू शकणार आहेत.

आवश्यक वयोमर्यादा 

या पदासाठी 20 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत. SC अर्थातच शेड्युल कास्ट आणि शेड्युल ट्राईब (ST) प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत पाच वर्षाची सूट बहाल करण्यात आली आहे. तसेच ओबीसी प्रवर्गातील म्हणजेच इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेत तीन वर्षांची सूट दिली जाणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार?

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करावा लागणार आहे. ibps.in या आयबीपीएस च्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाइन पद्धतीने सादर करता येणार आहे.

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक

खरंतर या भरतीसाठी 21 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत देण्यात आली होती. मात्र आता यासाठी सात दिवसांची मुदत वाढ देण्यात आली आहे. यानुसार आता 28 ऑगस्ट 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करता येणार आहेत.

जाहिरात कुठं पाहणार

https://drive.google.com/file/d/1bT8xj44V0W4-mp4w3JOiki31kbbLaPy2/view?usp=drivesdk या लिंक वर जाऊन या भरतीची जाहिरात पाहत येणे शक्य आहे.

Leave a Comment