Banking Jobs : बँकिंग एक्झामसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. खरंतर गेल्या काही वर्षांमध्ये बँकिंग एक्झामसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांच्या संख्येत मोठी वाढ झाली आहे.अनेकांची आता बँकेत नोकरी करण्याची इच्छा आहे.
जर तुमचीही बँकेत नोकरी करण्याची इच्छा असेल आणि तुम्हीही बँकिंग एक्झाम साठी तयारी करत असाल तर तुमच्यासाठी एक सुवर्णसंधी चालून आली आहे. ती म्हणजे देशातील सर्वात मोठ्या बँकेत काही रिक्त पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे.
स्टेट बँक ऑफ इंडियाने 2000 रिक्त पदांसाठी ही भरती काढली आहे. यासाठीची अधिसूचना देखील बँकेच्या माध्यमातून निर्गमित झाली आहे. दरम्यान आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियाने काढलेल्या या भरती बाबत आज आपण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदांसाठी होणार भरती?
स्टेट बँक ऑफ इंडिया कडून प्रोबेशनरी ऑफिसर म्हणजे PO या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. SBI ने SBI PO रिक्रुटमेंट 2023 साठी नुकतीच अधिसूचना प्रसिद्ध केली आहे.
किती पदांसाठी होणार भरती
अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, या अंतर्गत 2000 रिक्त पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
कोणत्याही विषयातील पदवीधर या पदासाठी पात्र राहणार आहे. मात्र पदवीधर उमेदवाराने मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेतून पदवी पूर्ण केलेली असणे आवश्यक आहे. या भरतीसाठी पदवीच्या शेवटच्या वर्षात असलेले उमेदवार देखील अर्ज करू शकतात मात्र जेव्हा मुलाखत होईल तेव्हा सदर उमेदवाराला पदवी पूर्ण केल्याचे प्रमाणपत्र सादर करावे लागणार आहे.
आवश्यक वयोमर्यादा
21 ते 30 वर्षे वयोगटातील उमेदवार या भरतीसाठी पात्र राहणार अशी माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे.
अर्ज कुठे करणार
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवार sbi.co.in या लिंक वर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करू शकतात.
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक
27 सप्टेंबर 2023 पर्यंत या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येणार आहे.