DRDO Recruitment 2023 : आज आपण नेहमीप्रमाणेच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एका भरतीची माहिती घेऊन हजर झालो आहोत. आज आपण डीआरडीओ मध्ये निघालेल्या भरतीबाबत माहिती पाहणार आहोत. संरक्षण संशोधन आणि विकास संस्था अर्थातच डीआरडीओ मध्ये पदवीधर प्रशिक्षणार्थी आणि तंत्रज्ञ शिकाऊ या अप्रेंटिस पदासाठी पदभरती आयोजित करण्यात आली आहे.
या पदभरतीच्या माध्यमातून या दोन्ही पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार असून यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन केले जात आहे. विशेष म्हणजे यासाठीची अधिसूचना देखील निर्गमित झाली आहे.
पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने विहित मुदतीत अर्ज सादर करावा लागणार आहे. आता आपण या भरतीसाठी कोणते उमेदवार पात्र राहणार, किती जागा भरल्या जाणार, अर्ज कुठे सादर करावा लागणार, उमेदवारांची निवड कशी होणार याबाबत थोडक्यात जाणून घेणार आहोत.
कोणत्या अन किती पदांसाठी होणार भरती
डीआरडीओ ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, पदवीधर प्रशिक्षणार्थीम्हणजे Graduate Trainee या पदाच्या एकूण 20 रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. तसेच तंत्रज्ञ शिकाऊ म्हणजे Apprentice Technician या पदाच्या एकूण 24 रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. म्हणजे एकूण 44 जागांसाठी ही भरती आयोजित झाली आहे.
आवश्यक पात्रता
सदर पदांसाठी B.E/ B.Tech/ Diploma/ BBA/ B.Com पदवीधारक उमेदवार पात्र राहणार आहेत. परंतु 2019 पूर्वी पदवी पूर्ण केलेले उमेदवार यासाठी अपात्र राहतील. म्हणजेच 2019 नंतर पदवी पूर्ण केलेले उमेदवारच यासाठी पात्र राहणार आहेत.
अर्ज कसा करावा लागणार
या भरतीसाठी फक्त ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याची सुविधा उमेदवारांसाठी उपलब्ध करून देण्यात आली आहे. Director, Integrated Test Range (ITR), चांदीपूर, बालासोर, ओडिशा – ७५६०२५ या पत्त्यावर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज विहित मुदतीत पाठवायचा आहे.
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 6 ऑक्टोबर 2023 रोजी किंवा त्यापूर्वी आपला अर्ज वर दिलेल्या पत्त्यावर पाठवायचा आहे. दिलेल्या मुदतीत सादर झालेल्या अर्जावरच विचार होणार आहे विहित मुदत उलटल्यानंतर जे अर्ज सादर होतील त्या अर्जांवर कुठल्याही सबबीवर विचार केला जाणार नाही याची नोंद घ्यायची आहे.
कोण-कोणती कागदपत्रे जोडावी लागणार
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज सादर करताना काही कागदपत्रांची पूर्तता करावी लागणार आहे. उमेदवारांना इयत्ता दहावी, बारावी आणि पदवीचे शैक्षणिक प्रमाणपत्र जोडावे लागणार आहे. सोबतच गुणपत्रिका देखील जोडावी लागणार आहे. मागास प्रवर्गातील तसेच इतर मागास प्रवर्गातील उमेदवारांना जातीचा दाखला जोडावा लागणार आहे. ओळखीचा पुरावा देखील द्यावा लागणार आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे अर्ज हा टंकलेखन केलेला असावा.
निवड कशी होणार
या पदासाठी डीआरडीओकडून लेखी चाचणी आणि वैयक्तिक मुलाखत घेऊन उमेदवारांची निवड केली जाणार आहे. निवडीबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना पाहणे जरुरीचे राहणार आहे.
अधिसूचना/जाहिरात कुठे पाहणार
https://drdo.gov.in/sites/default/files/career-vacancy-documents/Full_AdvertisementITR2108223.pdf या लिंक वर या पदभरतीची सविस्तर जाहिरात पाहता येणार आहे.