Gadgebaba University Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी माहिती समोर आली आहे. संत गाडगेबाबा अमरावती युनिव्हर्सिटी अंतर्गत येणाऱ्या सुदाम शिक्षण प्रसारण मंडळ यवतमाळ यांच्या अधिनस्त येणाऱ्या मातोश्री नानीबाई घारफलकर सायन्स कॉलेज बाभूळगाव, यवतमाळ आणि सिंधुताई कडू आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज जोडमोहा यवतमाळ येथे विविध रिक्त पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे.
यासाठीची अधिसूचना सुदाम शिक्षण प्रसारण मंडळ यांच्या माध्यमातून नुकतीच निर्गमित करण्यात आली आहे. तसेच अधिसूचना निर्गमित झाल्यापासून लगेचच अर्ज स्वीकृतीला सुरुवात झाली आहे. या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.
तथापि, जाहिरात निघाल्याच्या दिनांकापासून पंधरा दिवसांच्या आत या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. यामुळे आज आपण या भरतीबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या रिक्त पदांसाठी निघाली भरती
अधिसूचनेतून प्राप्त झालेल्या माहितीनुसार, प्रिन्सिपल, असिस्टंट प्रोफेसर, लाइब्रेरियन आणि डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन या पदाच्या रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
किती पदांसाठी होणार भरती
या भरती अंतर्गत प्रिन्सिपल या पदाची एक रिक्त जागा, असिस्टंट प्रोफेसर या पदाच्या 25 रिक्त जागा, लाइब्रेरियन या पदाची एक रिक्त जागा आणि डायरेक्टर ऑफ फिजिकल एज्युकेशन या पदाची एक रिक्त जागा भरली जाणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
वर दिलेल्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता राहणार आहे. यामुळे शैक्षणिक पात्रतेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी www.sgbau.ac.in या अधिकृत संकेतस्थळावर भेट देणे आवश्यक आहे.
नोकरी करण्याचे ठिकाण
या भरती अंतर्गत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना यवतमाळ जिल्ह्यातील बाबुळगाव आणि जोडमोहा या ठिकाणी नोकरी करावी लागणार आहे.
अर्ज कसा करावा लागणार
या भरतीसाठी ऑफलाईन अर्ज करायचा आहे. अध्यक्ष/सचिव, सुदाम शिक्षण प्रसारक मंडळ, मातोश्री नानीबाई घारफळकर विज्ञान महाविद्यालय बाबुळगाव जिल्हा यवतमाळ येथे अर्ज सादर करायचा आहे.
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक
या भरतीसाठी 23 सप्टेंबर 2023 पर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे.
जाहिरात कुठे पाहणार
https://drive.google.com/file/d/1CWhXUIbMDeyy8499Y9DmpDM-BzfHQ6x_/view?usp=drivesdk या लिंक वर या भरतीची सविस्तर जाहिरात पाहता येणार आहे.