केंद्र शासनाच्या ‘या’ विभागामध्ये माळी, वाहनचालक, चौकीदार इत्यादी पदांसाठी निघाली भरती; 10वी, 12वी पास उमेदवार राहणार पात्र !

Government Job : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. विशेषता ज्यांना केंद्र शासनाच्या विभागात नोकरी करण्याची इच्छा असेल त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी राहणार आहे.

केंद्र शासनाच्या अधिनस्त असलेल्या मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकमुनिकेशन इंजीनियरिंग मध्यप्रदेश येथे विविध रिक्त पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. या पदभरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदे भरली जाणार असून यासाठीची अधिसूचना नुकतीच संबंधित विभागाच्या माध्यमातून जारी करण्यात आली आहे.

सदर अधिसूचनेनुसार या पदभरतीच्या माध्यमातून माळी, वाहनचालक, चौकीदार, मल्टी टास्किंग स्टाफ, भंडारपाल इत्यादी रिक्त पदे भरली जाणार आहेत.

अशा परिस्थितीत आज आपण या केंद्र शासनाच्या अधीनस्त येणाऱ्या मिलिटरी कॉलेज ऑफ टेलीकम्युनिकेशन इंजीनियरिंग येथील पदभरती संदर्भात सर्व माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या आणि किती पदांसाठी होणार भरती

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, पेंटर 01, कारपेंटर 01, चौकीदार 06, वाहनचालक 06, इक्युपमेंट रिपेअर 01, ग्रांऊडमन 01, मेसेंजर 01, भांडारपाल 02, टेलर 01, टेलेकम्युनिकेशन मेकॅनिक 02, स्वयंपाकी 02, मल्टी टास्किंग स्टाफ 02, फेटीगनमॅन 03 जागा, माळी 01 जागा, कनिष्ठ लिपिक 08 अशा एकूण 37 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

वरमूद केलेल्या काही पदांसाठी दहावी पास आणि काही पदांसाठी बारावी पास उमेदवार पात्र राहणार आहेत. यामध्ये पेंटर, कार्पेंटर, भंडारपाल आणि कनिष्ठ लिपिक या पदासाठी बारावी पास उमेदवार पात्र राहणार आहेत. तसेच उर्वरित रिक्त पदांसाठी दहावी पास उमेदवार पात्र राहणार आहेत.

अर्ज कसा करावा लागणार

या भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. पीठासीन अधिकारी, छाननी कक्ष, सायफर डब्ल्यूजी, मिलिटरी कॉलेज ऑफ टेलिकम्युनिकेशन इंजिनिअरिंग, महू (एमपी) 453 441 या पत्त्यावर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज ऑफलाईन पद्धतीने पाठवायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून 28 दिवसांच्या आत वर नमूद केलेल्या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने वर दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे.

जाहिरात कुठे पाहणार

https://drive.google.com/file/d/1WSPeBpHDGNO-j2gRSOY4kRQo8_BU58jg/view?usp=drivesdk या लिंक वर जाऊन या पदभरतीची सविस्तर जाहिरात पाहता येणार आहे.

Leave a Comment