पदवीधर आहात ? ‘या’ विद्यापीठात निघाली मोठी भरती, पगार मिळणार तब्बल 35 हजार, कोणत्या पदांसाठी होणार भरती ? पहा….

Government Job : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी आहे. विशेष म्हणजे जे पदवीधर असतील त्यांच्यासाठी ही बातमी खास राहणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महाराष्ट्रातील एका नामांकित विद्यापीठात काही रिक्त पदांसाठी भरती काढण्यात आली आहे.

ही भरती कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठात होणार आहे. या विद्यापीठात विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी नुकतीच अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. या पदभरतीच्या माध्यमातून सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरतीबाबत सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या आणि किती पदांसाठी होणार भरती

उत्तर महाराष्ट्र विद्यापीठाने काढलेल्या अधिसूचनेनुसार, या विद्यापीठात सहाय्यक प्राध्यापक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पदाच्या एकूण 51 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

सदर अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार या पदासाठी पदव्युत्तर पदवी / बी.ई./बी.टेक. / बी.एस्सी./ एम.एस्सी / एम.टेक./एम.ई./ पीएच.डी. / पदवी किंवा समकक्ष, NET/SET उत्तीर्ण उमेदवार पात्र राहणार आहेत. तथापि शैक्षणिक पात्रतेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिसूचना काळजीपूर्वक वाचणे जरुरीचे राहणार आहे.

आवश्यक वयोमर्यादा

या पदासाठी कमाल 65 वर्षापर्यंतचे उमेदवार पात्र राहणार आहेत. अर्थातच 65 वर्ष वयापेक्षा अधिक वय असलेले उमेदवार या पदासाठी अपात्र ठरतील.

किती पगार मिळणार बरं

अधिसूचनेत उल्लेखित केल्याप्रमाणे या पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 24 हजार रुपये प्रति महिना ते 35 हजार रुपये प्रति महिना दरम्यान वेतन मिळणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार

या पदासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. https://nmu.ac.in/en-us/ या लिंक वर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवार आपला अर्ज ऑनलाईन सादर करू शकतात.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक कोणती

या पदासाठी 28 ऑगस्ट 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येणार आहे. विहित कालावधीनंतर मात्र उमेदवारांना अर्ज करता येणार नाही.

भरतीची जाहिरात कुठे पाहणार?

https://acrobat.adobe.com/link/track?uri=urn:aaid:scds:US:5b284e95-5309-3392-bf5a-d27b458a93d5 या लिंकवर जाऊन या पदभरतीची जाहिरात पाहता येणार आहे.

Leave a Comment