Government Job Maharashtra : सरकारी नोकरीला फार पूर्वीपासूनच प्रतिष्ठेची समजले जात आहे. सरकारी नोकरी असेल तर लाईफ सेट असे आपण नेहमीच म्हणत असतो. दरम्यान सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी गुड न्यूज समोर आली आहे.
कारण की, मुंबईमध्ये सरकारी नोकरीची संधी चालून आली आहे. यामुळे ज्या लोकांना मुंबईमध्ये नोकरी करायची असेल आणि सरकारीच नोकरी हवी असेल तर अशा लोकांसाठी ही एक निश्चितच आनंदाची पर्वणीच राहणार आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, खादी आणि ग्रामोद्योग आयोग मुंबई येथे विविध रिक्त पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. यासाठीची अधिसूचना आयोगाच्या माध्यमातून नुकतेच निर्गमित झाली आहे.
यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण मुंबई येथील खादी आणि ग्रामोद्योग आयोगामध्ये निघालेल्या या भरतीबाबतची सविस्तर माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या रिक्त पदांसाठी होणार भरती
अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार सहाय्यक संचालक I (ग्रामोद्योग), सहाय्यक संचालक I ( प्रशासन आणि मानव संसाधन), सहाय्यक संचालक (FBAA), सहायक संचालक I (Ec.R) या रिक्त पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत.
किती जागांसाठी होणार भरती?
वरील पदांच्या एकूण बारा रिक्त जागा या पद भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
वर दिलेल्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक अहर्ता आहे. यामुळे शैक्षणिक पात्रते बाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना वाचणे जरुरीचे आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी कमाल 35 वर्ष वय असलेले उमेदवार पात्र राहणार आहेत. 35 वर्ष वयापेक्षा अधिकचे उमेदवार या भरतीसाठी अपात्र राहतील.
नोकरी कुठे करावी लागणार
या पदभरती प्रक्रिया अंतर्गत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना राजधानी मुंबईत नोकरी करावी लागणार आहे.
अर्ज कुठे करणार
https://cdn.digialm.com/EForms/configuredHtml/1258/82819/Index.html या लिंक वर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज विहित कालावधीमध्ये सादर करता येणार आहे.
परीक्षा फी किती राहणार
या भरती अंतर्गत होणाऱ्या परीक्षेसाठी उमेदवाराला एक हजार रुपये एवढी एक्झाम फी भरावी लागणार आहे.
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक
30 सप्टेंबर 2023 पर्यंत या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करता येणार आहे. इच्छुकांनी विहित कालावधीमध्ये आपला अर्ज सादर करायचा आहे. विहित कालावधी उलटल्यानंतर कोणत्याही सबबीवर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत याची नोंद घ्यायची आहे.