पदवीधर उमेदवारांसाठी खुशखबर ! आयकर विभागात निघाली भरती, ‘या’ पदाच्या रिक्त जागांसाठी होणार भरती, पहा….

Graduate Job Maharashtra : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी गुड न्युज समोर आली आहे. विशेषता ज्या तरुणांचे पदवीपर्यंतचे शिक्षण पूर्ण झालेले असेल अशा तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी राहणार आहे. कारण की भारतीय आयकर विभागात म्हणजेच इन्कम टॅक्स डिपार्टमेंट मध्ये विविध रिक्त पदांसाठी नुकतीच पदभरती आयोजित करण्यात आली आहे.

यामुळे जर तुमचीही आयकर विभागात म्हणजेच इन्कम टॅक्स विभागात काम करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या भरती अंतर्गत अर्ज सादर करून आपली नोकरीचे स्वप्न पूर्ण करू शकता. दरम्यान इन्कम टॅक्स डिपार्टमेंटने या पदभरतीची सविस्तर जाहिरात नुकतीच निर्गमित केली आहे.

सदर जाहिरातीनुसार यंग प्रोफेशनल या पदाच्या रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. तसेच यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. अशा स्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

कोणत्या आणि किती पदांसाठी होणार भरती

इन्कम टॅक्स डिपार्टमेंट ने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार, या भरती प्रक्रिया अंतर्गत यंग प्रोफेशनल या पदाच्या बारा रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

सदर अधिसूचनेत यंग प्रोफेशनल या पदासाठी पदवीधर उमेदवार पात्र राहणार असल्याचे नमूद करण्यात आले आहे. पदवीधर किंवा समकक्ष उमेदवार या पदासाठी पात्र राहणार आहेत. मात्र सदर उमेदवारांनी मान्यता प्राप्त शिक्षण संस्थेतून पदवी ग्रहण केलेली असणे, शिक्षण घेतलेले असणे अनिवार्य आहे.

आवश्यक वयोमर्यादा

या पदासाठी कमाल 35 वर्षे वय असलेला उमेदवार पात्र राहणार आहे. अर्थातच 35 वर्षांपेक्षा अधिक वयाचे उमेदवार या भरतीसाठी अपात्र राहतील.

किती पगार मिळणार

या पदासाठी निवड झालेल्या उमेदवारांना प्रति महिना 40 हजार रुपये एवढे वेतन मिळणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार?

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज ऑफलाईन सादर करावा लागणार आहे. हा अर्ज आयकर सह आयुक्त कार्यालय (मुख्यालय) समन्वय कक्ष क्रमांक 335, आयकर भवन, महर्षी कर्वे रोड, मुंबई – 400 020 या पत्त्यावर इच्छुकांना पाठवायचा आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

18 सप्टेंबर 2023 पर्यंत या भरतीसाठी अर्ज सादर करता येणार आहे. विहित कालावधीत सादर झालेल्या अर्जावरच विचार होणार आहे. विहित कालावधी निघून गेल्यानंतर सादर झालेल्या अर्जावर कुठल्याच सबबीवर विचार होणार नाही याची नोंद उमेदवाराने घ्यायची आहे.

जाहिरात कुठं पाहणार?

https://drive.google.com/file/d/1Bx2q-LLk512QIGQlu_5y_dwNry5EMQDd/view?usp=drivesdk या लिंक वर जाऊन इच्छुकांना या भरतीची सविस्तर जाहिरात पाहता येणार आहे. 

Leave a Comment