मुंबईत नोकरी शोधताय? हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये निघाली ‘या’ पदासाठी मोठी भरती; कोण राहणार पात्र, कसा करणार अर्ज? वाचा…

Hindustan Petroleum Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्यांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि कामाची बातमी समोर येत आहे. विशेषता जे तरुण मुंबईमध्ये नोकरी शोधत असतील त्यांच्यासाठी ही सुवर्णसंधी राहणार आहे.

कारण की, हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये काही रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. हिंदुस्तान पेट्रोलियमने यासाठीची अधिसूचना देखील निर्गमित केली असून या अंतर्गत विविध पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

यासाठी हिंदुस्तान पेट्रोलियमने इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागविले आहेत. विशेष म्हणजे या भरती अंतर्गत थेट मुलाखत घेऊन उमेदवारांची निवड होणार आहे. इच्छुकांना मात्र लवकरात लवकर अर्ज सादर करायचे आहेत.

कारण की, यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंतच अर्ज सादर करता येणार आहेत. अशा परिस्थितीत, आज आपण हिंदुस्तान पेट्रोलियमने काढलेल्या या भरतीबाबत सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

हिंदुस्तान पेट्रोलियममध्ये रिक्त असलेल्या वरिष्ठ अधिकारी, सहायक व्यवस्थापक/व्यवस्थापक, वरिष्ठ व्यवस्थापक, मुख्य व्यवस्थापक, उपमहाव्यवस्थापक या पदाच्या रिक्त जागा भरला जाणार आहेत.

किती जागांसाठी होणार भरती

वर नमूद केलेल्या पदांच्या एकूण 37 रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. यात वरिष्ठ अधिकाऱ्याची सहा रिक्त पदे, सहाय्यक व्यवस्थापक / व्यवस्थापकाची 14 पदे, वरिष्ठ व्यवस्थापकाची 13 पदे, मुख्य व्यवस्थापकाची तीन पदे, उपमहाव्यवस्थापकाचे एक पदाचा समावेश राहणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता 

Ph.D./M.E/M.Tech. पदवीधर उमेदवार वर नमूद केलेल्या पदांसाठी पात्र राहणार आहेत. तथापि शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी इच्छुकांना एकदा अधिसूचना काळजीपूर्वक वाचावी लागणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार?

https://jobs.hpcl.co.in/Recruit_New/recruitlogin.jsp या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे.

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक?

30 सप्टेंबर 2023 पर्यंत या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज वर दिलेल्या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे. विहित कालावधीनंतर अर्ज सादर करता येणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे.

जाहिरात कुठं पाहणार?

https://drive.google.com/file/d/1G6A3JsqCqUtp-2gXq0ZKMfu9w3C7plJ2/view?usp=drivesdk

Leave a Comment