ICG Recruitment 2023 : देशसेवेची इच्छा उराशी बाळगून असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी कामाची बातमी समोर आली आहे. ज्या तरुणांना भारतीय तटरक्षक दलात जाऊन देशाची सेवा करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही बातमी विशेष खास राहणार आहे.
कारण की भारतीय तटरक्षक दलात नुकतीच भरती आयोजित झाली आहे. या भरती प्रक्रिया अंतर्गत तटरक्षक दलातील काही रिक्त पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे यासाठीची अधिसूचना कोस्टल गार्ड अर्थातच भारतीय तटरक्षक दलाने नुकतीच निर्गमित केली आहे.
यानुसार तटरक्षक दलातील या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून इच्छुक आणि या पदासाठी पात्र ठरत असलेल्या उमेदवारांना लवकरात लवकर आपला अर्ज सादर करण्याचे आवाहन यावेळी केले जात आहे.
अशा स्थितीत जर आपणासही भारतीय तटरक्षक दलात जाऊन देशसेवा करण्याची इच्छा असेल तर आजची ही बातमी तुम्ही शेवटपर्यंत नक्कीच वाचायला हवी. कारण की आज आपण या पद भरतीची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदांसाठी होणार भरती
इंडियन कोस्टल गार्ड अर्थातच भारतीय तटरक्षक दलात असिस्टंट कमांडंट या पदाच्या रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरण्याचे जाहीर करण्यात आले आहे.
किती पदांसाठी होणार भरती
अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार या भरती प्रक्रिया अंतर्गत असिस्टंट कमांडंट या पदाच्या भारतीय तटरक्षक दलात रिक्त असलेल्या 46 जागा भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
या पदासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता तसेच इतर पात्रतेबाबत सविस्तर माहिती भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.
अर्ज कसा करायचा आहे
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. जर आपणास या भरतीसाठी अर्ज सादर करायचा असेल तर आपण भारतीय तटरक्षक दलाच्या अधिकृत संकेतस्थळावर भेट देऊन या भरतीसाठी अर्ज सादर करू शकता.
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक
या भरतीसाठी एक सप्टेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून उमेदवारांना पंधरा दिवसांपर्यंत अर्थातच 15 सप्टेंबर 2023 पर्यंत या भरतीसाठी अर्ज सादर करता येणार आहे.