खुशखबर…! 10वी उत्तीर्ण तरुणांसाठी नौदलात नोकरीची संधी, 26 ऑगस्टपासून सुरू होणार अर्ज प्रक्रिया, पहा…

Indian Navy Recruitment : देशभरातील दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. विशेषता ज्या तरुणांना सरकारी नोकरीची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही बातमी अतिशय महत्त्वाची आहे.

भारतीय नौदलात विविध रिक्त पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. विशेष म्हणजे या पदासाठीची अधिसूचना अर्थातच जाहिरात देखील निर्गमित करण्यात आली आहे.

या पदासाठीची जाहिरात नुकतीच निर्गमित करण्यात आली असून या पदांसाठी 26 ऑगस्ट 2023 पासून ऑनलाईन अर्ज भरण्याची प्रोसेस सुरू होणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात थोडक्यात पण सविस्तर माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या रिक्त पदांसाठी होणार भरती?

भारतीय नौदलाने निर्गमित केलेल्या सदर अधिसूचनेनुसार, भारतीय नौदलात ट्रेड्समन मेट या पदाच्या रिक्त जागा या पद भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

किती जागा भरल्या जाणार?

मिळालेल्या माहितीनुसार या पदभरती अंतर्गत ट्रेड्समन मेट या पदाच्या 362 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

सदर अधिसूचनेनुसार या पदासाठी दहावी पास तसेच संबंधित ट्रेड मधील आयटीआय उत्तीर्ण असलेला उमेदवार पात्र राहणार आहे. मात्र या पदासाठी मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलेला उमेदवारच अर्ज करू शकणार आहे.

आवश्यक वयोमर्यादा

या पदासाठी 18 ते 25 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत. अर्थातच 18 वर्षांपेक्षा कमी आणि 25 वर्षांपेक्षा जास्त वयाचे पात्र उमेदवार देखील या भरतीसाठी अपात्र राहणार आहेत.

अर्ज कसा करावा लागणार?

या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. www.indiannavy.nic.in या भारतीय नौदलाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

या पदभरतीसाठी अजून अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. अर्ज भरण्यास 26 ऑगस्ट 2023 नंतर सुरुवात होणार आहे आणि 25 सप्टेंबर 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येणार आहे.

Leave a Comment