इंडियन ऑइलमध्ये नोकरीची संधी ! ‘या’ पदाच्या 400 रिक्त जागा भरल्या जाणार, अर्ज कुठे करणार, पहा…

Indian Oil Recruitment 2023 : जर तुम्ही नोकरीच्या शोधात असाल तर तुमच्यासाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. इंडियन ऑइल मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. या पदभरती अंतर्गत विविध पदांच्या जवळपास 400 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

यासाठीची अधिसूचना इंडियन ऑइलने नुकतीच निर्गमित केली असून इच्छुकांना लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. इंडियन ऑइल कॉर्पोरेशनने काढलेल्या सदर अधिसूचनेनुसार विविध अप्रेंटिस पदाच्या रिक्त जागा या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत.

यासाठी इच्छुकांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. अशा स्थितीत आज आपण या पदभरतीची सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदांसाठी होणार भरती

इंडियन ऑइल मध्ये टेक्निशिअन, ट्रेड अप्रेंटिस, अकाउंट्स एक्झिक्युटिव्ह, ग्रॅज्युएट या विभागांमध्ये अप्रेंटीस या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

किती पदांसाठी होणार भरती?

या भरती प्रक्रिया अंतर्गत इंडियन ऑइल 400 रिक्त जागा भरणार आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता काय?

वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता राहणार आहे. काही पदांसाठी संबंधित ट्रेड मधील आयटीआय धारक उमेदवार पात्र राहणार आहेत तर काही पदांसाठी संबंधित डिप्लोमा धारक उमेदवार पात्र राहणार आहेत. यामुळे शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना वाचणे आवश्यक आहे.

आवश्यक वयोमर्यादा

या भरतीसाठी किमान 19 आणि कमाल 24 म्हणजेच 19 ते 24 वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत. 19 पेक्षा कमी आणि 24 वर्षांपेक्षा अधिक वय असलेले उमेदवार या पद भरतीसाठी अपात्र राहतील याची नोंद घ्यायची आहे. 

नोकरीचे ठिकाण कोणते 

या पदभरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना तामिळनाडू, पुद्दुचेरी, कर्नाटक, केरळ, आंध्र प्रदेश आणि तेलंगणा या राज्यांमध्ये नोकरीसाठी पाठवले जाणार आहे.

अर्ज कुठे करणार 

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. http://www.iocl.com इंडियन ऑइलच्या या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येणार आहे.

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 10 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज सादर करता येणार आहे.

Leave a Comment