Maharashtra Government Job : सरकारी नोकरीसाठी तयारी करणाऱ्या राज्यातील तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर येत आहे. जर तुम्हीही सरकारी नोकरीसाठी तयारी करत असाल तर आजची ही बातमी शेवटपर्यंत नक्कीच वाचा. सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी राज्याच्या जलसंपदा विभागात नोकरीची संधी चालून आली आहे.
खारभूमी विकास मंडळ अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. विशेष बाब अशी की यासाठीच्या अधिसूचना निर्गमित झाली आहे. दरम्यान आज आपण या पदभरती बाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदासाठी होणार भरती?
या भरतीसाठी जारी करण्यात आलेल्या अधिसूचनेनुसार कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता आणि सहाय्यक अभियंता या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
किती पदांसाठी होणार भरती
या पदभरतीच्या माध्यमातून जलसंपदा विभागाच्या खारभूमी विकास मंडळ अंतर्गत कनिष्ठ, शाखा आणि सहाय्यक अभियंता या 3 पदाच्या एकूण पाच रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
या पदासाठी सिव्हिल इंजिनिअरिंगची पदवी धारण करणारे उमेदवार पात्र राहणार आहेत. सोबतच सदर उमेदवाराला सदर पदावरील कामाचा कमीत कमी २ वर्षांचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा लागणार
सदर भरतीसाठी ऑफलाइन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
- कार्यकारी अभियंता, खारभूमी सर्वेक्षण व अन्वेषण विभाग, पेण, उंबर्डे फाटा, गजानन महाराज मंदिराजवळ, रामवाडी पेण, जि. रायगड.
- कार्यकारी अभियंता, द.र. खारभूमी विकास विभाग, रत्नागिरी, जि. रत्नागिरी.
- कार्यकारी अभियंता, सिंधुदूर्ग खारभूमी (Government Job) विकास विभाग, सिंधुदुर्गनगरी, जि. सिंधुदूर्ग.
या पत्त्यावर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येणार आहे.
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक
या पदांसाठी 12 सप्टेंबर 2023 पर्यंत अर्ज करता येणार आहे. मात्र विहित कालावधीनंतर सादर झालेल्या अर्जावर कुठल्याच सबबीवर विचार केला जाणार नाही याची नोंद घायची आहे.
जाहिरात कुठे पाहणार?
https://drive.google.com/file/d/1DRmByO54JhJsaQjJ500YVjANcEGJq90Y/view?usp=drivesdk या लिंक वर जाऊन इच्छुक उमेदवारांना या भरतीची जाहिरात पाहता येणार आहे.