मुंबईत नोकरीची सुवर्णसंधी ! महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळात निघाली भरती, कोणती पदे भरली जाणार? पहा….

Maharashtra Sarkari Job : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. विशेषता ज्या तरुणांना मुंबईत नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही बातमी विशेष खास राहणार आहे.

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने विविध रिक्त पदांसाठी भरती आयोजित केली आहे. विशेष बाब अशी की, यासाठीची सविस्तर अधिसूचना पर्यटन विकास महामंडळाच्या माध्यमातून नुकतीच निर्गमित करण्यात आली आहे.

सदर जाहिरातीनुसार महामंडळात निघालेल्या या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाइन पद्धतीने महामंडळाने दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवायचा आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदांसाठी होणार भरती

महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने काढलेल्या जाहिरातीनुसार, विशेष कार्य अधिकारी आणि सल्लागार या दोन पदाच्या रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

विशेष कार्य अधिकारी आणि सल्लागार या पदासाठीची आवश्यक शैक्षणिक पात्रता mtdc.co अधिकृत संकेतस्थळावर जाऊन पाहता येणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार

या भरतीसाठी ऑफलाइन अर्ज मागविण्यात आले आहे. मुख्यालय, मफतलाल हाऊस, १ ला माळा, एच टी पारेख मार्ग, १६९, बॅकबे रिक्लेमेशन, चर्चगेट, मुंबई ४०००२० या पत्त्यावर इच्छुकांनी पात्र उमेदवारांना आपला अर्ज विहित कालावधीत सादर करता येणार आहे.

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक

10 सप्टेंबर 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येणार आहे. विहित कालावधीनंतर सादर झालेल्या अर्जावर कोणत्याच सबबीवर विचार केला जाणार नाही याची नोंद उमेदवाराने घ्यायची आहे.

भरतीची जाहिरात कुठं पाहणार 

https://drive.google.com/file/d/1NZguG1jZwoHXwAf2OzA8IhhzKJBXYz4d/view?usp=drivesdk या लिंकवर जाऊन या पदभरतीची सविस्तर जाहिरात पाहता येणार आहे. 

Leave a Comment