MIDC Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या महाराष्ट्रातील तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाचे अपडेट समोर आले आहे. विशेषता ज्या तरुणांना सरकारी नोकरीची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही बातमी अधिक खास राहणार आहे.
हाती आलेल्या माहितीनुसार, एमआयडीसीमध्ये म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात विविध रिक्त पदांसाठी भरती निघाली आहे. या पदभरती अंतर्गत महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळात 802 रिक्त पदांच्या जागा भरल्या जाणार आहे.यासाठीची अधिसूचना महामंडळाच्या माध्यमातून नुकतीच निर्गमित करण्यात आली आहे.
यामुळे ज्या तरुणांना सरकारी नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी राहणार असे बोलले जात आहे. दरम्यान आज आपण या पदभरतीबाबत सर्व आवश्यक तपशील थोडक्यात जाणून घेण्याचा तपशीलवार प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदांसाठी होणार भरती
महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने जारी केलेल्या अधिसूचनेनुसार ग्रुप ए, ग्रुप बी, ग्रुप सी पदांसाठी ही भरती राहणार आहे. यासाठी इच्छुकांना लवकरात लवकर अर्ज सादर करायचा आहे.
किती पदांसाठी होणार भरती
या पदभरती प्रक्रिया अंतर्गत एकूण 802 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
ग्रुप ए, ग्रुप बी आणि ग्रुप सी मधील या रिक्त पदांसाठी वेगवेगळ्या शैक्षणिक पात्रता राहणार आहेत. यामुळे याबाबतची सविस्तर माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर भेट द्यावी लागणार आहे.
वयोमर्यादा
या भरतीसाठी 18 ते 40 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत. आरक्षित उमेदवारांना नियमानुसार सुटणार आहे.
अर्ज कसा करावा लागणार
या भरतीसाठी एमआयडीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक
या भरतीसाठी 25 सप्टेंबर 2023 पर्यंत इच्छुक उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाईन सादर करता येणार आहे.