मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनमध्ये नोकरीची संधी ! ‘या’ पदासाठी थेट मुलाखतीने होणार निवड, अर्ज कुठं पाठवणार?

MRVC Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी अपडेट समोर आली आहे. विशेषता ज्या तरुणांना मुंबईमध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही सुवर्णसंधी राहणार आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मध्ये विविध पदांच्या रिक्त जागांसाठी भरती केली जाणार आहे. विशेष बाब म्हणजे यासाठीची अधिसूचना निर्गमित झाली आहे.

यानुसार संबंधित पदांसाठी थेट मुलाखत घेऊन उमेदवाराची निवड केली जाणार आहे. दरम्यान आज आपण या पदभरती बाबत सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशनने काढलेल्या नोटिफिकेशन नुसार, सदर कॉर्पोरेशन मध्ये प्रोजेक्ट इंजिनियर अर्थातच प्रकल्प अभियंता या पदाचा रिक्त जागा या पद भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

किती जागांसाठी होणार भरती?

प्रोजेक्ट इंजिनिअर या पदाच्या एम आर वी सी मध्ये रिक्त असलेल्या वीस जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक पात्रता आणि अनुभव

प्रोजेक्ट इंजिनिअर पदासाठी अर्ज करणारा उमेदवार हा स्थापत्य अभियांत्रिकी पदवीधर म्हणजेच सिविल इंजिनिअर असावा. सदर उमेदवाराने मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. सिव्हिल इंजिनिअरिंगची डिग्री किमान 60 टक्के गुणांसह मिळवलेला उमेदवार या पदासाठी पात्र राहणार आहे. यासोबतच उमेदवाराला संबंधित कामाचा किमान दोन वर्षाचा अनुभव असणे देखील आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी कमाल 30 वर्ष वय असलेला उमेदवार पात्र राहणार आहे. अर्थातच तीस वर्षांपेक्षा अधिक वयाचे उमेदवार या पदासाठी अपात्र ठरतील. मात्र शेड्युल कास्ट आणि शेड्युल ट्राईब प्रवर्गातील उमेदवारांना पाच वर्षाची आणि इतर मागास प्रवर्गातील म्हणजेच ओबीसी प्रवर्गातील उमेदवारांना तीन वर्षाची वयोमर्यादेत सूट राहणार आहे.

किती पगार मिळणार

या पदभरती अंतर्गत निवड झालेल्या उमेदवाराला मुंबईमध्ये काम करावे लागणार आहे. तसेच नियुक्त उमेदवारांना चाळीस हजार रुपये ते एक लाख चाळीस हजार रुपये प्रति महिना वेतन दिले जाणार आहे.

मुलाखत केव्हा आणि कुठे होणार  

या पदासाठी कोणतीच लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवाराची थेट मुलाखत घेऊन निवड केली जाणार आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन लिमिटेड, दुसरा माळा, चर्चगेट स्थानक इमारत, चर्चगेट, मुंबई- 400020 या पत्त्यावर 25 ते 29 सप्टेंबर 2023 दरम्यान मुलाखत घेतली जाणार आहे. 

भरतीची सविस्तर माहिती कुठं पाहणार?

https://mrvc.indianrailways.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या पदभरती बाबत अधिक माहिती जाणून घेता येणार आहे. 

Leave a Comment