MRVC Recruitment : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी रेल्वे विकास कॉर्पोरेशन मुंबई येथून एक महत्त्वाची आणि अतिशय आनंदाची बातमी समोर येत आहे. मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन अर्थातच एम आर व्ही सी ने काही रिक्त पदांसाठी भरती आयोजित केली आहे.
यामुळे ज्या तरुणांना मुंबईत नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी राहणार आहे. जर तुम्हालाही मुंबईत नोकरी करायची इच्छा असेल तर ही भरती निश्चितच तुमच्यासाठी फायदेशीर ठरू शकते. दरम्यान एमआरव्हीसीने आयोजित केलेल्या या भरतीसाठी नुकतीच अधिसूचना जारी केली आहे.
विशेष म्हणजे या भरती अंतर्गत रिक्त पदासाठी उमेदवाराची थेट मुलाखतीने निवड केली जाणार आहे. म्हणजेच या भरती अंतर्गत कोणतीच लेखी परीक्षा आयोजित केले जाणार नाही. यामुळे आज आपण या भरतीबाबत सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदांसाठी होणार साठी
मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन मुंबई येथे प्रोजेक्ट इंजिनिअर अर्थातच प्रकल्प अभियंता या पदाच्या रिक्त जागांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे.
किती पदांसाठी होणार भरती
या पद भरती प्रक्रिया अंतर्गत वीस रिक्त पदांची भरती होणार आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
या पदासाठी स्थापत्य अभियांत्रिकी पदवी किंवा समकक्ष पदवी प्राप्त उमेदवार पात्र राहणार आहेत. मात्र किमान 60 टक्के गुणांसह पदवी परीक्षा उत्तीर्ण उमेदवारच यासाठी पात्र राहतील.
किती वेतन मिळणार?
या पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवाराला चाळीस हजार रुपये प्रति महिना ते एक लाख 40 हजार रुपये प्रति महिना एवढे वेतन दिले जाणार आहे.
नोकरी करण्याचे ठिकाण
या पदभरती अंतर्गत ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना मुंबईत नोकरी करावे लागणार आहे.
मुलाखत केव्हा आणि कुठे होणार
या पदभरती अंतर्गत उमेदवारांची निवड थेट मुलाखतीने होणार आहे. म्हणजेच या भरतीसाठी कोणतीच लेखी परीक्षा आयोजित केले जाणार नाही. ही मुलाखत 25 ते 29 सप्टेंबर 2023 दरम्यान होणार आहे. मुलाखत मुंबई रेल्वे विकास कॉर्पोरेशन, दुसरा मजला, चर्चगेट स्टेशन बिल्डिंग, चर्चगेट, मुंबई 400020