MSRTC Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. विशेषता सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही बातमी खास राहणार आहे.
कारण की एसटी महामंडळात अर्थातच महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया आयोजित करण्यात आले आहे. या पदभरतीच्या माध्यमातून महामंडळातील वर्ग अ, ब व संवर्ग ब मधील कनिष्ठ स्तरावरील विविध रिक्त पदे सरळ सेवा भरतीच्या माध्यमातून महामंडळाकडून भरली जाणार आहेत.
विशेष बाब अशी की, यासाठीची अधिसूचना देखील महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या माध्यमातून नुकतीच निर्गमित करण्यात आली आहे. त्यामुळे ज्या तरुणांना एसटी महामंडळात काम करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही सुवर्णसंधी राहणार आहे.
दरम्यान, या भरतीसाठी पात्र आणि इच्छुक तरुणांना लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन संबंधितांच्या माध्यमातून केले जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण एसटी महामंडळात निघालेल्या या पदभरतीबाबत सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदांसाठी होणार होती
यंत्र अभियंता वर्ग एक, विभागीय वाहतूक अधिकारी वर्ग दोन, उपयंत्र अभियंता / आगार व्यवस्थापक, लेखा अधिकारी / लेखा परीक्षण, भांडार अधिकारी, विभागीय वाहतूक अधीक्षक / आगार व्यवस्थापक (वाहतूक), सहाय्यक यंत्र अभियंता / आगार व्यवस्थापक (यांत्रिक), सहाय्यक / विभागीय लेखा अधिकारी, विभागीय सांख्यिकी अधिकारी या पदाच्या रिक्त जागा या पद भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
किती रिक्त जागांसाठी होणार भरती
वर नमूद केलेल्या विविध रिक्त पदांच्या एकूण 65 जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. यंत्र अभियंता वर्ग १ : ११ जागा, विभागीय वाहतुक अधिकारी वर्ग २ : ८ जागा, उप यंत्र अभियंता / आगार व्यवस्थापक: १२ जागा, लेखा अधिकारी / लेखा परिक्षण : ०२ जागा, भांडार अधिकारी : ०२ जागा, विभागीय वाहतुक अधिक्षक / आगार व्यवस्थापक (वाहतुक) : १२ जागा, सहाय्यक यंत्र अभियंता / आगार व्यवस्थापक (यांत्रिक) : ०९ जागा, सहाय्यक / विभागीय लेखा अधिकारी : ०२ जागा, विभागीय सांख्यिकी अधिकारी : ०७ जागा अशा एकूण 65 जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार असल्याची माहिती अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
वर नमूद केलेल्या विविध पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक राहणार आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रते संदर्भात सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी मूळ जाहिरात पाहणे जरुरीचे आहे. मात्र या सर्व पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवाराला मराठी बोलता वाचता लिहिता येणे आवश्यक असून सदर उमेदवाराने एमएससीआयटी हा कोर्स केलेला असणे देखील आवश्यक आहे.
अर्ज कसा करावा लागणार ?
या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा आहे. https://msrtc.maharashtra.gov.in/ या अधिकृत संकेतस्थळावर इच्छुकांना आपला अर्ज सादर करता येणार आहे.
मूळ जाहिरात कुठं पाहणार?
https://drive.google.com/file/d/1GOvaxo45D0keq3O-0h7Gm8dUztZf0Mu7/view?usp=drivesdk या लिंक वर जाऊन या पदभरतीची मूळ जाहिरात पीडीएफ स्वरूपात पाहता येणार आहे.