NIA Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या पदवीधर उमेदवारांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर आली आहे. ही बातमी ज्या तरुणांना नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी अर्थातच एन आय ए मध्ये काम करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी खूपच खास राहणार आहे.
कारण की एन आय ए मध्ये विविध रिक्त पदांच्या भरतीसाठी नुकतीच जाहिरात निर्गमित करण्यात आली आहे. यासाठी एनआयए म्हणजेच नॅशनल इन्वेस्टीगेशन एजन्सी अर्थातच राष्ट्रीय तपास संस्थेने अर्ज मागवले आहेत.
इच्छुक आणि पात्र उमेदवारांना यासाठी विहित कालावधीमध्ये अर्ज सादर करण्याचे आवाहन केले जात आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरतीची सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदांसाठी होणार भरती
अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, राष्ट्रीय तपास संस्थेमध्ये उप विधी अधिकारी, वरिष्ठ सरकारी वकील, सरकारी वकील, प्रधान माहिती अधिकारी या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.
किती पदांसाठी होणार भरती
या पदभरती प्रक्रिये अंतर्गत वर दिलेल्या पदांच्या एकूण 13 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यात उप विधी अधिकारी – ४ पदे, वरिष्ठ सरकारी वकील – ३ पदे, सरकारी वकील- ५ पदे, प्रधान माहिती अधिकारी – १ पद अशी एकूण 13 रिक्त पदे भरली जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
प्रधान माहिती अधिकारी या पदासाठी पदवीधर उमेदवार पात्र राहणार आहेत. तसेच उर्वरित पदांसाठी कायदा विषयातील पदवीधर उमेदवार पात्र राहणार आहेत. तथापि शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर माहिती अधिसूचनेत दिलेली आहे यामुळे अधिसूचना सविस्तर वाचणे जरुरीचे राहणार आहे.
पगार किती मिळणार बरं?
अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार या पदभरती अंतर्गत उप विधी अधिकारी पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना ५६ हजार १०० रुपये ते १ लाख ७७ हजार ५०० रुपये प्रति महीना वेतन मिळणार आहे. तसेच वरिष्ठ सरकारी वकील या पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना ६७ हजार ७०० रुपये ते २ लाख ८ हजार ७०० रुपये एवढे वेतन दिले जाणार आहे. या अंतर्गत सरकारी वकील पदावर निवड होणाऱ्या उमेदवारांना ७८ हजार ८०० रुपये ते २ लाख ९ हजार २०० रुपये एवढे वेतन दिले जाणार आहे. याशिवाय प्रधान माहिती अधिकारी या पदावर नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना १ लाख २३ हजार १०० रुपये ते २ लाख १५ हजार ९०० रुपये एवढे वेतन दिले जाणार आहे.
अर्ज कसा करावा लागणार
या पदांसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑफलाइन अर्ज करायचा आहे. SP (Admi), NIA मुख्यालय, CGO कॉम्प्लेक्स, लोधी रोड, नवी दिल्ली – ११०००३ या पत्त्यावर इच्छुकांना आपला अर्ज पाठवता येणार आहे.
अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक
या भरती अंतर्गत भरल्या जाणाऱ्या वेगवेगळ्या पदांसाठी अर्ज सादर करण्यासाठी दिलेली मुदत देखील वेगवेगळी आहे. यात काही पदांसाठी नऊ ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत तर काही पदांसाठी 21 ऑक्टोबर पर्यंत अर्ज सादर करता येणार आहेत.