NSIC Recruitment 2023 : गेल्या काही वर्षांमध्ये तरुण वर्गाचा माईंड सेट पूर्णपणे बदलला आहे. आता तरुण वर्ग सरकारी नोकरीकडे मोठ्या प्रमाणात आकृष्ट होत आहे. देशभरातील करोडो विद्यार्थी सरकारी नोकरीसाठी तयारी करत आहेत. जर तुम्हीही अशाच करोडो विद्यार्थ्यांपैकी एक असाल आणि सरकारी नोकरीची इच्छा असेल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी आनंदाची बातमी समोर आली आहे.
ती म्हणजे नॅशनल स्मॉल इंडस्ट्रीज कॉर्पोरेशन म्हणजेच राष्ट्रीय लघुउद्योग महामंडळात विविध रिक्त पदांसाठी एक भरती निघाली आहे. त्यासाठी महामंडळाच्या माध्यमातून अधिसूचना निर्गमित करण्यात आली आहे. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून महामंडळाने अर्ज देखील मागवले आहेत.
अशा स्थितीत जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल तर तुमच्यासाठी ही सरकारी नोकरी मिळवण्याची सुवर्णसंधी राहणार आहे. दरम्यान आता आपण या भरतीची थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या आणि किती पदांसाठी होणार भरती?
अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, या भरती अंतर्गत असिस्टंट मॅनेजर अर्थातच सहाय्यक व्यवस्थापक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. याअंतर्गत वित्त आणि लेखा म्हणजे फायनान्स आणि अकांउट्सची १९ पदे, मानव संसाधन म्हणजे HR, ह्युमन रिसोर्सची ०२ पदे, व्यवसाय विकास म्हणजे बिझनेस डेव्हलपमेंटची २१ पदे, तंत्रज्ञान म्हणजे टेक्नलॉजीची ०५ पदे, कायदा आणि पुनर्प्राप्ती म्हणजे लॉ आणि रिकव्हरीची ०२ पदे, कंपनी सचिव म्हणजे कंपनी सेक्रेटरीचे ०१ पद, राजभाषाचे ०१ पद अशा एकूण 51 रिक्त पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
पदानुसार शैक्षणिक पात्रतेमध्ये भिन्नता राहणार आहे. त्यामुळे शैक्षणिक पात्रतेबाबत सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना पाहणे आवश्यक आहे.
आवश्यक वयोमर्यादा
वर दिलेल्या सर्व पदांसाठी कमाल 28 वर्ष वयाचे उमेदवार पात्र राहणार आहेत. तथापि आरक्षित प्रवर्गातील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत शिथिलता बहाल केली आहे.
किती पगार मिळणार
या भरती अंतर्गत नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 30 हजारापासून ते एक लाख वीस हजार पर्यंतचे वेतन मिळणार आहे.
अर्ज कसा करावा लागणार?
या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना https://nsic.co.in/recruitment/ या अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्ज करता येणार आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक?
या भरतीसाठी 29 सप्टेंबर 2023 पर्यंत इच्छुक उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. उमेदवारांना विहित कालावधीतच अर्ज करायचा आहे. विहित कालावधीनंतर उमेदवारांना अर्ज करता येणार नाही याची नोंद उमेदवाराने घ्यायची आहे.
जाहिरात कुठे पाहणार?
https://www.nsic.co.in/PDFs/Careers/2023830144715.pdf या लिंक वर या भरतीची सविस्तर जाहिरात पाहता येणार आहे.