ONGC Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांना ओएनजीसी अर्थातच ऑइल अँड नॅचुरल गॅस कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेत नोकरीची सुवर्णसंधी उपलब्ध झाली आहे.
ओएनजीसीने नुकत्याच काही दिवसांपूर्वी 2023 मधील नवीन पदभरती काढली आहे. याअंतर्गत या संस्थेत विविध रिक्त पदांसाठी पात्र उमेदवारांची भरती केली जाणार आहे. विशेष बाब अशी की यासाठीची अधिसूचना ओएनजीसीने नुकतीच निर्गमित केली आहे.
या अधिसूचनेनुसार विविध अप्रेंटिस पदासाठी ही भरती आयोजित करण्यात आली आहे. या पदभरती अंतर्गत अप्रेंटिस पदाच्या तब्बल 2500 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून ONGC ने अर्ज मागवले आहेत.
अर्ज प्रक्रिया 1 सप्टेंबर 2023 पासून सुरू झाली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले आहे. आता आपण या भरतीची सर्व इत्यंभूत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करूया.
कोणत्या आणि किती रिक्त पदांसाठी होणार भरती
ONGC ने काढलेल्या अधिसूचनेनुसार, ग्रॅज्युएट अप्रेंटीस, डिप्लोमा अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस या अप्रेंटिस पदाच्या रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत. या विविध पदाच्या तब्बल 2500 रिक्त जागा या पद भरतीच्या माध्यमातून भरण्याचे नियोजन आहे.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
या भरतीमध्ये समाविष्ट असलेल्या वेगवेगळ्या पदांसाठी वेगवेगळी शैक्षणिक पात्रता आवश्यक राहणार आहे. यामुळे शैक्षणिक पात्रतेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी अधिसूचना वाचणे आवश्यक आहे.
आवश्यक वयोमर्यादा
या पदासाठी 18 ते 24 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत. तथापि अधिक माहितीसाठी अधिसूचना वाचणे आवश्यक आहे.
मानधन किती मिळणार
ग्रॅज्युएट अप्रेंटिस या पदासाठी 9000 रुपये प्रति महिना, डिप्लोमा अप्रेंटिस या पदासाठी आठ हजार रुपये प्रति महिना, ट्रेड अप्रेंटिस या पदासाठी सात हजार रुपये प्रति महिना एवढे मानधन दिले जाणार आहे.
अर्ज कसा करायचा आहे
ओएनजीसीच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. अर्ज विहित कालावधीमध्ये भरणे आवश्यक आहे. विहित कालावधी उलटल्यानंतर अर्ज भरता येणार नाही याची नोंद घ्यायची आहे.
अर्ज करण्याची शेवटची दिनांक
एक सप्टेंबर पासून या भरतीसाठी इच्छुक उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांना 20 सप्टेंबर 2023 पर्यंत या भरतीसाठी अर्ज सादर करता येणार आहेत.
जाहिरात कुठे पाहणार
https://ongcindia.com/documents/77751/2660534/apprenticeship2023.pdf/788211c7-a0f3-826c-a62a-166826bed9ca या लिंक वर जाऊन या भरतीची सविस्तर जाहिरात पाहता येणार आहे.