दहावी उत्तीर्ण तरुणांसाठी खुशखबर ! ‘या’ जिल्ह्यात पोलीस पाटील पदासाठी निघाली मोठी भरती, इथं करा अर्ज

Police Patil Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. ती म्हणजे पोलीस पाटील पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यात ही भरती निघाली आहे. या पदभरती अंतर्गत पोलीस पाटील पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

यामुळे जर तुम्हीही खेड तालुक्यातील रहिवासी असाल आणि पोलीस पाटील पदासाठी इच्छुक असाल तर तुम्ही या पदभरतीचा लाभ घेऊन आपले पोलीस पाटील बनण्याचे स्वप्न पूर्ण करू शकता. दरम्यान आज आपण या पदभरती बाबत सविस्तर अशी माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदांसाठी होणार भरती

रत्नागिरी जिल्ह्यातील खेड तालुक्यातील पोलीस पाटील या पदाच्या रिक्त जागा या पद भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

किती पदांसाठी होणार भरती

या पदभरतीच्या माध्यमातून 102 उमेदवारांची निवड केली जाणार आहे. अर्थातच 102 रिक्त पदे या भरतीच्या माध्यमातून भरणे प्रस्तावित आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

या पदासाठी किमान 10 वी उत्तीर्ण उमेदवार पात्र राहणार आहे. पण ज्या गावातील पोलीस पाटील हे पद रिक्त आहे अर्जदार त्याच गावातील रहिवासी असणे आवश्यक आहे.

अर्ज कसा करावा लागणार

यासाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. Https://khedrtn.ppbharti.in या संकेतस्थळावर इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

उमेदवारांना 20 सप्टेंबर 2023 सायंकाळी साडेपाच वाजेपर्यंत या भरतीसाठी अर्ज सादर करता येणार आहे. अर्ज हा विहित मुदतीत सादर करायचा आहे. मुदत उलटल्यानंतर सादर झालेल्या अर्जावर विचार होणार नाही.

Leave a Comment