Powergrid Corporation Recruitment 2023 : नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठे अपडेट समोर आले आहे. हे अपडेट इंजीनियरिंग केलेल्या विद्यार्थ्यांसाठी विशेष खास राहणार आहे. केंद्र शासनाच्या पावर ग्रिड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया या संस्थेत विविध रिक्त पदांसाठी भरतीची घोषणा करण्यात आली आहे.
या अंतर्गत पावर ग्रिड कॉर्पोरेशन मध्ये रिक्त असलेल्या विविध पदांची भरती केली जाणार आहे. तूर्तास कॉर्पोरेशनच्या माध्यमातून या भरतीबाबत संक्षिप्त अधिसूचना जारी करण्यात आली आहे. या भरतीची सविस्तर अधिसूचना येत्या काही दिवसात कॉर्पोरेशनच्या माध्यमातून जारी केली जाणार आहे. मात्र कॉर्पोरेशनने काढलेल्या या संक्षिप्त अधिसूचनेत या भरतीबाबत अनेक महत्त्वाच्या बाबींचा उल्लेख करण्यात आला आहे.
यामध्ये कोणत्या आणि किती पदांची भरती होणार, यासाठी शैक्षणिक पात्रता काय लागणार, अर्ज प्रक्रिया केव्हा सुरू होणार आणि अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक कोणती राहणार याविषयी माहिती देण्यात आली आहे. दरम्यान आज आपण ही माहिती सविस्तर पण थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या पदासाठी होणार भरती
पावर ग्रिड कॉर्पोरेशनमध्ये प्रशिक्षणार्थी म्हणजेच ट्रेनीं पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. इलेक्ट्रिकल, सिविल आणि इलेक्ट्रॉनिक्सच्या प्रशिक्षणार्थी पदाच्या जागा या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत.
किती पदांसाठी होणार भरती
डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल) – ३४४, डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल) – ६८, डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) – १३ अशा एकूण 425 रिक्त जागा या भरती अंतर्गत भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता
डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रिकल) या पदासाठी इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंगचा डिप्लोमा, डिप्लोमा ट्रेनी (सिव्हिल) पदासाठी सिव्हिल इंजिनीअरिंचा डिप्लोमा आणि डिप्लोमा ट्रेनी (इलेक्ट्रॉनिक्स) पदासाठी इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंगचा डिप्लोमा धारक उमेदवार पात्र राहणार असल्याची माहिती संक्षिप्त अधिसूचनेत नमूद करण्यात आली आहे.
केव्हा सुरू होणार अर्ज प्रक्रिया
या भरतीसाठी 1 सप्टेंबर 2023 पासून अर्ज प्रक्रिया सुरू होणार आहे. अर्थातच अजून या भरतीसाठी अर्ज भरण्यास सुरुवात झालेली नाही. येत्या दोन दिवसात या भरतीसाठी अर्जाची प्रक्रिया सुरू होणार आहे.
अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक
या भरतीसाठी 23 सप्टेंबर 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येणार असल्याची माहिती संक्षिप्त अधिसूचनेत देण्यात आली आहे.