पुण्यात सरकारी नोकरीची सुवर्णसंधी ! दूरसंचार विभागात ‘या’ पदासाठी निघाली भरती, इथं पाठवा अर्ज

Pune Job : जर तुम्ही पुण्यात नोकरी शोधत असाल तर तुमच्यासाठी एक मोठी बातमी समोर आली आहे. दूरसंचार विभाग पुणे येथे विविध रिक्त पदांसाठी भरती काढण्यात आली आहे. या पदभरती अंतर्गत दूरसंचार विभागात विविध रिक्त पदांच्या 16 जागा भरल्या जाणार आहेत.

विशेष म्हणजे यासाठीची अधिसूचना नुकतीच निर्गमित करण्यात आली आहे. सदर अधिसूचनेनुसार इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज विहित कालावधीत ऑफलाइन पद्धतीने पाठवायचा आहे.

निश्चितच पुण्यात सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही एक सुवर्णसंधी राहणार आहे. दरम्यान आज आपण या भरती संदर्भात सर्व आवश्यक आणि इत्यंभूत माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदासाठी निघाली भरती 

दूरसंचार विभागाने काढलेल्या नोटिफिकेशन नुसार या भरती अंतर्गत अभियंता आणि कनिष्ठ वायरलेस अधिकारी या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

किती पदांसाठी होणार भरती

अभियंता पदाच्या 13 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत आणि कनिष्ठ वायरलेस अधिकारी या पदाच्या 3 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. अर्थातच या पदभरती अंतर्गत एकूण 16 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

1)नोटिफिकेशन मध्ये दिलेल्या माहितीनुसार अभियंता पदासाठी रेडिओ कम्युनिकेशन किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन या स्पेशल विषयासह टेलिकम्युनिकेशन इंजीनियरिंग किंवा इलेक्ट्रिकल इंजीनियरिंग पदवीधारक उमेदवार यासाठी पात्र राहणार आहे.

किंवा 

भौतिकशास्त्र आणि रेडिओ कम्युनिकेशन या विषयासह किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा टेलिकम्युनिकेशन हा स्पेशल विषयासह विज्ञानातील पदव्युत्तर पदवी म्हणजे एम एस सी केलेला उमेदवार पात्र राहणार आहे.

किंवा,

वायरलेस कम्युनिकेशन, इलेक्ट्रॉनिक्ससह M.Sc म्हणजेच विज्ञानातील पदव्युत्तर पदवी किंवा त्या समतुल्य पदवीधारक या पदासाठी पात्र राहणार आहे.

2)तसेच कनिष्ठ वायरलेस अधिकारी या पदासाठी मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेमधून दूरसंचार किंवा इलेक्ट्रिकल किंवा इलेक्ट्रॉनिक्स किंवा रेडिओ कम्युनिकेशन या क्षेत्रातील अभियांत्रिकी किंवा तंत्रज्ञानाची पदवीधारक या पदासाठी पात्र राहणार आहे.

 किंवा

(II)मान्यताप्राप्त विद्यापीठ किंवा संस्थेकडून maritime mobile किंवा एक्रो-मोबाइल कम्युनिकेशन्समधील प्रमाणपत्र धारक उमेदवार या पदासाठी पात्र राहणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार

अवर सचिव (प्रशासन l), दूरसंचार विभाग, कक्ष क्रमांक 417, संचार भवन, 20, अशोका रोड, नवी दिल्ली- 110001 या पत्त्यावर ऑफलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. अर्ज विहित मुदतीत सादर करायचा आहे. मुदतीनंतर सादर झालेल्या अर्जावर विचार होणार नाही याची नोंद घ्यायची आहे. 

अर्ज करण्याची शेवटची तारीख

11 सप्टेंबर 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना वर दिलेल्या पत्त्यावर आपला अर्ज पाठवता येणार आहे.

 जाहिरात कुठे पाहणार 

https://drive.google.com/file/d/1tSXXCQBCOC8Em8gKmWSngk8UhH_oWoiT/view?usp=drivesdk या लिंकवर या पदभरतीची जाहिरात पाहता येणार आहे.

Leave a Comment