पुण्यात नोकरीची सुवर्णसंधी ! जिल्हा परिषदेत ‘या’ पदासाठी निघाली भरती, 12वी पास उमेदवार राहणार पात्र

Pune ZP Recruitment : जर तुम्हीही नोकरीच्या शोधात असाल विशेषता पुण्यात नोकरी शोधत असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खूपच खास राहणार आहे. कारण की पुणे जिल्हा परिषद अंतर्गत विविध रिक्त पदांसाठी नुकतीच भरती आयोजित करण्यात आली आहे.

या पदभरती अंतर्गत पुणे जिल्हा परिषदेमधील विविध रिक्त पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. या जिल्हा परिषदेत विविध रिक्त पदांच्या तब्बल 89 जागा भरल्या जाणार आहेत. विशेष म्हणजे या पदांची भरती थेट मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे.

अर्थातच या भरती अंतर्गत कोणत्याच प्रकारची लेखी परीक्षा या ठिकाणी पुणे जिल्हा परिषद अंतर्गत आयोजित केली जाणार नाही. यामुळे उमेदवारांना थेट मुलाखत देऊन या ठिकाणी नोकरी करण्याची ही एक सुवर्णसंधी राहणार आहे.

या भरतीसाठी दर मंगळवारी मुलाखत आयोजित करण्यात आली असल्याची माहिती देण्यात आली आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती बाबत सर्व आवश्यक माहिती अगदी थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदांसाठी होणार भरती

वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य सेवक या पदांच्या रिक्त जागा या पद भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

किती जागांसाठी होणार भरती

या पदभरती अंतर्गत वैद्यकीय अधिकाऱ्याच्या 31 जागा आणि आरोग्य सेवक या पदाच्या 58 रिक्त जागा भरल्या जाणार अशी माहिती अधिसूचनेत देण्यात आली आहे. अर्थातच या दोन्ही पदांच्या 89 रिक्त जागा या भरतीच्या माध्यमातून पुणे जिल्हा परिषदेने भरण्याचे ठरवले आहे.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

आरोग्य सेवक या पदासाठी बारावी पास उमेदवार पात्र राहणार आहेत. तसेच वैद्यकीय अधिकारी या पदासाठी एमबीबीएस पदवीधारक उमेदवार पात्र राहणार आहेत.

किती पगार मिळणार

वैद्यकीय अधिकारी या पदासाठी नियुक्त होणाऱ्या उमेदवारांना 60 हजार रुपये वेतन मिळणार आहे. तसेच आरोग्य सेवक या पदावर ज्या उमेदवारांची नियुक्ती होईल त्यांना 18 हजार रुपये प्रति महिना मानधन मिळणार आहे.

मुलाखत कुठं होणार?

पुणे जिल्हा परिषद, राष्ट्रीय आरोग्य अभियान, आरोग्य विभाग, ४था मजला, शिवनेरी सभागृह या पत्त्यावर या भरतीसाठीची मुलाखत प्रक्रिया आयोजित करण्यात आली आहे. जोपर्यंत जिल्हा परिषदेमधील ही रिक्त पदे भरली जात नाही तोपर्यंत महिन्याच्या दर मंगळवारी मुलाखत घेतली जाणार अशी माहिती समोर आली आहे.

जर समजा मंगळवारी सुट्टी राहिली तर दुसऱ्या दिवशी (शासकीय कामकाजाच्या दिवशी) मुलाखत घेतली जाणार आहे. आरोग्य सेवक पदासाठीच्या मुलाखतीसाठी दर मंगळवारी दुपारी अडीच वाजता उमेदवारांना हजर राहायचे आहे. मात्र वैद्यकीय अधिकारी या पदासाठीच्या मुलाखतीसाठी दर मंगळवारी सकाळी साडेअकरा वाजता उमेदवारांना हजर राहायचे आहे. 

आरोग्य सेवक पदाची जाहिरात

https://drive.google.com/file/d/1qoWRk11kNHcZnk9cJvD2iWSg0IZejSmG/view?usp=drivesdk

वैद्यकीय अधिकारी पदाची जाहिरात

https://drive.google.com/file/d/11s2N5RTp75kOVoKuLYlyHFhjght58P3c/view?usp=drivesdk 

Leave a Comment