पदवीधर आहात, नोकरीं शोधताय? RBI मध्ये ‘या’ पदासाठी निघाली मेगा भरती, 450 रिक्त जागा भरल्या जाणार, कुठं करणार अर्ज?

RBI Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि आनंदाची बातमी समोर आली आहे. विशेषतः जे तरुण पदवीधर असतील आणि सरकारी नोकरीची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही सुवर्णसंधी राहणार आहे.

आरबीआय अर्थातच रिझर्व बँक ऑफ इंडिया मध्ये एक मेगा भरती आयोजित झाली आहे. या पदभरतीच्या माध्यमातून विविध रिक्त पदांच्या तब्बल 450 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. त्यासाठीची अधिसूचना आरबीआयने नुकतीच निर्गमित केली आहे.

तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून यासाठी अर्ज मागविले जात आहेत. इच्छुक आणि पात्र मेदवारांना ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

कोणत्या पदांसाठी होणार भरती

रिझर्व बँक ऑफ इंडिया ने निर्गमित केलेल्या अधिसूचनेनुसार या पदभरती अंतर्गत सहाय्यक या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

किती पदांसाठी होणार भरती

RBI मध्ये रिक्त असलेल्या सहाय्यक पदाच्या 450 जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

कोणत्याही विषयातील पदवीधर या भरतीसाठी पात्र राहणार आहेत. मात्र सदर उमेदवाराने मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेतून पदवी ग्रहण केलेली असणे आवश्यक आहे. सोबतच सदर उमेदवाराला कॉम्प्युटरचे नॉलेज असणे आवश्यक आहे.

आवश्यक वयोमर्यादा

या भरतीसाठी 20 ते 28 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत. तसेच रिझर्व कॅटेगिरी मधील उमेदवारांना नियमानुसार सूट दिली जाणार आहे.

अर्ज कुठे करणार

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन अर्ज करायचा आहे. https://ibpsonline.ibps.in/rbiaaaug23/ या लिंकवर अर्ज करायचा आहे. आरबीआयने दिलेल्या मुदतीत अर्ज करायचा आहे.

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक

या भरतीसाठी 4 ऑक्टोबर 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज सादर करता येणार आहे.

जाहिरात कुठं पाहणार?

https://drive.google.com/file/d/1qsf45Ms8GjFlGyhRL0_Jd7viq75rX3RH/view?usp=drivesdk येथे या भरतीची जाहिरात पाहता येणार. 

Leave a Comment