Sarkari Job Maharashtra : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक मोठी अपडेट समोर आली आहे. महाराष्ट्र राज्य शासनाच्या नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभागात दहावी पास तरुणांसाठी नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाने नुकतीच एक पदभरती आयोजित केली आहे.
या भरतीच्या माध्यमातून शिपाई या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. या पद भरती प्रक्रिया अंतर्गत पुणे, कोकण, नागपूर, नाशिक, औरंगाबाद आणि अमरावती या विभागातील शिपाई पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. विशेष बाब म्हणजे सदर भरतीची अधिसूचना देखील संबंधित विभागाने निर्गमित केली आहे.
निश्चितच नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी ही भरती एक मोठी संधी उपलब्ध करून देणार आहे. अशा परिस्थितीत आज आपण या पदभरती संदर्भात सर्व माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.
कोणत्या अन किती पदासाठी होणार भरती
राज्य शासनाच्या नगररचना आणि मूल्य निर्धारण विभागाअंतर्गत शिपाई या ड संवर्गातील रिक्त पदाच्या जागा भरल्या जाणार आहेत. या पदाच्या एकूण 125 जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि वयोमर्यादा
या पदासाठी किमान दहावी उत्तीर्ण उमेदवार पात्र राहणार आहेत. सदर उमेदवारांनी मात्र मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलेले असणे अनिवार्य आहे. तसेच शिपाई या पदासाठी 18 ते 40 या वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत. तसेच नियमानुसार मागासवर्गीय उमेदवारांना, खेळाडूंना नियमानुसार वयोमर्यादेत शिथिलता दिली जाणार आहे.
पगार किती मिळणार
या भरती अंतर्गत ज्या उमेदवारांची शिपाई या पदासाठी निवड होईल त्यांना संवर्ग ड नुसार 15000 ते 47 हजार 600 रुपये प्रति महिना दरम्यान वेतन दिले जाणार आहे.
अर्ज कसा करावा लागणार
या भरतीसाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करावा लागणार आहे. https://dtp.maharashtra.gov.in/ या लिंक वर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करता येणार आहे.
अर्ज फी किती राहणार
मागासवर्गीय उमेदवारांना 900 रुपये आणि ओपन कॅटेगिरी मध्ये उमेदवारांना 1000 रुपये परीक्षा शुल्क लागणार आहे.
अर्ज केव्हा भरता येणार
अजून या भरतीसाठी अर्ज प्रक्रिया सुरू झालेली नाही. अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार 20 सप्टेंबर 2023 नंतर या भरतीसाठी करता येणार आहे.
जाहिरात कुठे पाहणार
https://drive.google.com/file/d/1gmDGIdrGwI17qVhPogxTeygPIuNLMDyf/view?usp=drivesdk या लिंक वर या पदभरतीची जाहिरात पाहता येणार आहे.