SBI बँकेत नोकरीची सुवर्णसंधी ! ‘या’ पदासाठी निघणार भरती, पदवीधर उमेदवार राहणार पात्र, जाहिरात केव्हा निघणार?

SBI Bank Recruitment 2023 : बँकिंग क्षेत्रात नोकरी मिळवण्यासाठी तयारी करत असलेल्या लाखो तरुण-तरुणींसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. ती म्हणजे देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वात मोठ्या बँकेत लवकरच एक मोठी पदभरती आयोजित केली जाणार आहे.

या पदभरती अंतर्गत एसबीआय बँकेत विविध रिक्त पदांच्या जागा भरल्या जाणार आहेत. अलीकडे सायन्स, आर्ट्स, कॉमर्स एवढेच काय तर इंजीनियरिंगचे शिक्षण पूर्ण केलेले उमेदवार देखील बँकेत नोकरी शोधत आहेत. बँकेतील नोकरी आता अनेकांना हवीहवीशी वाटत आहे.

त्यामुळे जर तुमचीही बँकिंग क्षेत्रात नोकरी करण्याची इच्छा असेल तर एसबीआयच्या या पदभरतीसाठी अर्ज करून तुम्ही तुमची इच्छा पूर्ण करू शकणार आहात. मिळालेल्या माहितीनुसार एसबीआय बँकेच्या माध्यमातून लवकरच क्लर्क आणि प्रोबेशनरी ऑफिसर्स या पदासाठी भरती काढली जाणार आहे. यासाठीचे नोटिफिकेशन येत्या काही दिवसात जारी केले जाणार आहे.

सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या किंवा तिसऱ्या आठवड्यात याची अधिसूचना निर्गमित होणार असल्याची माहिती एका प्रतिष्ठित मीडिया रिपोर्ट मधून समोर आली आहे. यामुळे जर तुमची एसबीआय मध्ये या पदासाठी काम करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला तुमच्या अभ्यासात सातत्य ठेवावे लागणार आहे.

लवकरच नोटिफिकेशन निघणार असल्याने अभ्यास वाढवावा लागणार आहे. दरम्यान आज आपण या भरतीसाठी आवश्यक असलेल्या पात्रता आणि निकष याबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तसेच पीओ आणि क्लर्क या दोन पदांमधील फरकही आज आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. 

आवश्यक पात्रता

क्लर्क आणि प्रोबेशनरी ऑफिसर्स या दोन्ही पदासाठी पदवीधर उमेदवार पात्र राहतील. या पदांसाठी कोणत्याही शाखेतून पदवीधर उमेदवार पात्र राहतो मात्र उमेदवाराने मान्यता प्राप्त शैक्षणिक संस्थेतून पदवी प्राप्त केलेली असणे आवश्यक आहे. तसेच या पदांसाठी 20 ते 28 वर्षं वयोगटातील उमेदवार पात्र राहतात. म्हणजेच किमान वीस वर्षे आणि कमाल 28 वर्ष वय असलेले उमेदवार यासाठी पात्र राहतात.

प्रोबेशनरी ऑफिसर्स आणि क्लर्क मधील फरक 

जे उमेदवार क्लर्क या पदावर नियुक्त होतात त्यांना रोख जमा करणं, रोख रक्कम काढणे, पासबुक एंट्री घेणं, RTGS-NEFT, चेक जमा करणं अशी कामे करावी लागतात. पण PO म्हणजेच प्रोबेशनरी ऑफिसर हे बँकेतील अधिकारी असतात.

म्हणजेच ज्या उमेदवारांची या पदावर निवड होते ते बँकेतील अधिकारी म्हणून कामकाज पाहतात. ते सुरुवातीला 1 ते 2 वर्षं प्रोबेशन कालावधीत राहतात म्हणून त्यांना प्रोबेशनरी ऑफिसर असे म्हणतात. या पदावर नियुक्त होणाऱ्यांना कर्ज कोणाला द्यावं, कोणाला देऊ नये इत्यादी महत्त्वाचे निर्णय घ्यावे लागतात. 

Leave a Comment