मुंबईत नोकरीची संधी ! SBI ने काढली ‘या’ पदासाठी भरती, इथं पाठवा अर्ज

SBI Recruitment 2023 : गेल्या काही वर्षांमध्ये बँकेच्या नोकरीसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांची संख्या वाढली आहे. आर्ट्स, कॉमर्स सायन्स एवढेच नाही तर इंजीनियरिंग केलेले उमेदवार देखील आता बँकेत नोकरी पुण्याची इच्छा बाळगून आहेत. बँकेत नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाचे आणि मोठी अपडेट समोर आली आहे.

विशेषता ज्यांना मुंबईत नोकरी करण्याची इच्छा असेल अशा लोकांसाठी ही मोठी बातमी राहणार आहे. कारण की स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेने रिक्त पदाच्या भरतीसाठी एक जाहिरात काढली आहे. या जाहिरातीनुसार, एसबीआय मुंबई शाखेतील रिक्त पदांसाठी काढण्यात आलेल्या या भरती अंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवारांची निवड होणार आहे.

याचाच अर्थ या भरती अंतर्गत कोणतीच लेखी परीक्षा घेतली जाणार नाही. उमेदवाराची निवड ही 100 गुणांच्या मुलाखतीच्या माध्यमातून होणार आहे. म्हणजेच ज्या उमेदवारांना मुलाखतीत अधिक गुण राहतील त्या उमेदवाराची या रिक्त जागेवर नियुक्ती होणार आहे. दरम्यान आता आपण कोणत्या पदासाठी भरती होणार, किती जागांसाठी भरती होणार, आवश्यक शैक्षणिक पात्रता, वयोमर्यादा यांसारख्या सर्वच बाबींची माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदासाठी होणार भरती

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेत सीनियर प्रेसिडेंट या पदाच्या रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभब 

पीजीडीएम/ पीजीडीबीएस/ एमबीए किंवा त्या समकक्ष पदवी ग्रहण केलेला उमेदवार या पदासाठी पात्र राहणार आहे. मात्र उमेदवाराने मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून पदवी घेतलेली असणे आवश्यक आहे. या पदासाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराकडे सदर पदावर काम केल्याचा पंधरा वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या पदासाठी 40 ते 45 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत. म्हणजे किमान 40 वर्ष आणि कमाल 45 वर्ष वय असलेले उमेदवारच या पदासाठी पात्र राहतील यापेक्षा कमी किंवा यापेक्षा जास्त वयाचे उमेदवार यासाठी पात्र राहणार नाहीत.

किती पगार मिळणार?

या पदावर निवड झालेल्या उमेदवाराला तब्बल 85 लाख पण पर्यंत पगार दिला जाणार आहे.

अर्ज कुठे करणार

यासाठी स्टेट बँक ऑफ इंडियाच्या मुंबई शाखेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन इच्छुकांना अर्ज सादर करता येणार आहे. सादर करण्याचे अंतिम दिनांक सात सप्टेंबर 2023 आहे. त्यामुळे इच्छुक लोकांना लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन केले जात आहे

Leave a Comment