स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरीची संधी ! ‘या’ पदासाठी निघाली भरती, कोण राहणार पात्र? पहा….

State Bank Of India : गेल्या काही वर्षांमध्ये बँकिंग एक्झामसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांमध्ये दिवसागणिक भर पडत आहे. मोठ्या प्रमाणात तरुण बँकिंग एक्झामसाठी तयारी करत आहेत. दरम्यान बँकिंग एक्झामसाठी तयारी करणाऱ्या उमेदवारांसाठी एक अतिशय आनंदाची आणि मोठी बातमी समोर आली आहे.

ती म्हणजे स्टेट बँक ऑफ इंडियात नोकरीची सुवर्णसंधी चालून आली आहे. एसबीआयमध्ये काही रिक्त पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या पदभरती अंतर्गत एसबीआय मध्ये रिक्त असलेल्या पदांच्या 107 जागा भरल्या जाणार आहेत.

यासाठीची अधिसूचना स्टेट बँक ऑफ इंडिया कडून निर्गमित करण्यात आली आहे. दरम्यान आज आपण स्टेट बँक ऑफ इंडियाने काढलेल्या या पदभरतीची सविस्तर अशी माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदांसाठी होणार भरती

एसबीआयने जाहीर केलेल्या अधिसूचनेनुसार, आर्मरर्स आणि लिपिक संवर्गातील कंट्रोल रूम ऑपरेटर या 2 पदाच्या रिक्त जागा या पदभरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.

किती जागा भरल्या जाणार

सदर अधिसूचनेनुसार, एसबीआय ने काढलेल्या 2023 मधील या नवीन पदभरती अंतर्गत आर्मरर्स या पदाच्या १८ जागा आणि कंट्रोल रूम ऑपरेटरच्या ८९ जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक पात्रता

SBI ने सांगितल्याप्रमाणे आर्मरर्स या पदासाठी माजी सैनिक, माजी सीएपीएफ जवान (AR) पात्र राहणार आहेत. तर लिपिक संवर्गातील कंट्रोल रूम ऑपरेटर पदांसाठी केवळ माजी सैनिक, माजी सीएपीएफ जवान (AR), माजी अग्निशमन सेवा कर्मचारी पात्र राहणार आहेत. अर्थातच ही भरती इतर सर्वसामान्य उमेदवारांसाठी राहणार नाही.

अर्ज कसा करणार

या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांना ऑनलाइन पद्धतीने अर्ज सादर करायचा आहे. यासाठी उमेदवार स्टेट बँक ऑफ इंडियाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन अर्ज सादर करू शकतात. https://bank.sbi/web/careers या लिंकवर जाऊन देखील उमेदवारांना या भरतीसाठी अर्ज सादर करता येणार आहे.

अर्ज सादर करण्याची अंतिम दिनांक

मिळालेल्या माहितीनुसार या भरतीसाठी 10 ऑक्टोबर 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज भर दिलेला संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने भरता येणार आहे. विहित कालावधीनंतर कोणत्याही परिस्थितीत अर्ज सादर करता येणार नाही याची नोंद उमेदवारांनी घ्यायची आहे. यामुळे इच्छुकांनी लवकरात लवकर या भरतीसाठी अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

जाहिरात कुठे पाहणार

https://sbi.co.in/documents/77530/36548767/050920231755-Detailed+AD+Final.pdf/ या लिंक वर जाऊन इच्छुकांना या भरतीची सविस्तर जाहिरात पाहता येणार आहे.

Leave a Comment