Tata Memorial Center Recruitment : जर तुम्ही आयटीआय केलेला असेल आणि नोकरीच्या शोधात असाल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी विशेष खास राहणार आहे. कारण की, टाटा मेमोरियल सेंटर मध्ये आयटीआय पास आऊट उमेदवारांसाठी नोकरीची संधी चालून आली आहे.
यामुळे जर तुम्हाला टाटा मेमोरियल सेंटर मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्ही या पदभरतीचा लाभ घेऊ शकतात आणि टाटा मेमोरियल सेंटर मध्ये नोकरीचे तुमचे स्वप्न पूर्ण करू शकता.
टाटा मेमोरियल सेंटर मध्ये विविध रिक्त पदांसाठी नुकतीच जाहिरात काढण्यात आली असून या पदभरतीच्या अंतर्गत थेट मुलाखतीच्या माध्यमातून उमेदवाराची निवड होणार आहे.
म्हणजे या विविध रिक्त पदांसाठी कोणतीच परीक्षा या ठिकाणी आयोजित केली जाणार नाही. अशा परिस्थितीत आज आपण या थेट मुलाखत घेऊन राबवल्या जाणाऱ्या पदभरतीबाबत सविस्तर अशी माहिती जाणून घेणार आहोत.
कोणत्या पदासाठी होणार भरती
मिळालेल्या माहितीनुसार टाटा मेमोरियल सेंटर अर्थातच टीएमसी मध्ये लिफ्ट तंत्रज्ञ अर्थातच लिफ्ट टेक्निशियन या पदासाठी भरती आयोजित करण्यात आली आहे.
किती पदांसाठी होणार भरती
याबाबत सदर जाहिरातीमध्ये माहिती देण्यात आलेली नाही मात्र टाटा मेमोरियल सेंटरमध्ये रिक्त असलेल्या रिक्त तंत्रज्ञ या पदाच्या जागा या भरतीच्या माध्यमातून भरल्या जाणार आहेत.
आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव
शासनमान्य संस्थेतून आयटीआय उत्तीर्ण उमेदवार या पदासाठी पात्र राहणार आहे. उमेदवाराकडे मान्यता प्राप्त संस्था / NCVT प्रमाणपत्र असणे बंधनकारक राहणार आहे. तसेच संबंधित फील्डमधील कामाचा पाच वर्षाचा अनुभव असणे आवश्यक आहे.
किती वेतन मिळणार
या पदासाठी ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना तीस हजार रुपये ते 40 हजार रुपये प्रति महिना एवढे मानधन दिले जाणार आहे.
मुलाखत केव्हा होणार?
येत्या तीन दिवसात अर्थातच 25 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी दहा वाजता या रिक्त पदासाठी मुलाखत घेतली जाणार आहे.
मुलाखत कुठे होणार?
तिसर्या मजल्यावर, खानोलकर शोधिका, टीएमसी-एसीटीआरईसी (TMC-ACTREC), सेक्टर २२, खारघर, नवी मुंबई : ४१० २१० या पत्त्यावर मुलाखत घेतली जाणार आहे.