ठाणे महानगरपालिकेत नोकरीची संधी ! ‘या’ पदासाठी निघाली मेगाभरती, 30 हजार पगार, 12वी पास उमेदवार करू शकतात अर्ज

Thane Municipal Corporation Recruitment : तुम्ही जर नोकरीच्या शोधात असाल विशेषतः ठाणे शहरात नोकरी करण्याची इच्छा असेल तर आजची ही बातमी तुमच्यासाठी खास राहणार आहे.

कारण की, ठाणे महानगरपालिकेच्या माध्यमातून विविध रिक्त पदांसाठी भरती प्रक्रिया राबवली जात आहे. विशेष म्हणजे थेट मुलाखत घेऊन या रिक्त पदाची भरती केली जाणार आहे. यासाठीची अधिसूचना नुकतीच प्रसिद्ध झाली आहे.

ही अधिसूचना ठाणे महानगरपालिकेच्या अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आली असून इच्छुक आणि पात्र उमेदवारांना या पदभरतीसाठी लवकरात लवकर अर्ज सादर करण्याचे आवाहन यावेळी महापालिकेच्या माध्यमातून करण्यात आले आहे.

दरम्यान, आज आपण ठाणे महानगरपालिकेने काढलेल्या या पदभरती बाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या पदासाठी होणार भरती

ठाणे महानगरपालिकेने रिक्त असलेल्या नर्स पदाच्या जागा भरण्याचा निर्णय घेतला आहे.

किती पदांसाठी होणार भरती

ठाणे महानगरपालिकेने काढलेल्या जाहिरातीनुसार, नर्स पदाच्या एकूण 72 रिक्त जागा या पद भरतीच्या माध्यमातून थेट मुलाखत घेऊन भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता आणि अनुभव 

नर्स या पदासाठी उमेदवार बारावी पास असणे जरुरीचे आहे तसेच सदर उमेदवार GNM आणि बी.एस्सी नर्सिंग उत्तीर्ण असणे देखील आवश्यक आहे. तसेच सदर उमेदवाराला मराठी भाषेचे ज्ञान असायला हवे. नर्स पदाचा किमान तीन वर्षाचा अनुभव सदर उमेदवाराकडे असणे बंधनकारक आहे.

आवश्यक वयोमर्यादा

नर्स पदासाठी खुल्या प्रवर्गातील कमाल चाळीस वर्ष वयाचे आणि मागास प्रवर्गासाठी कमाल 45 वर्षे वयाचे उमेदवार पात्र राहणार आहेत. अर्थात यापेक्षा अधिक वयाचे उमेदवार या पदासाठी अपात्र ठरतील.

किती पगार मिळणार

या पदभरतीच्या माध्यमातून ज्या उमेदवारांची निवड होईल त्यांना प्रति महिना 30 हजार रुपये एवढे वेतन दिले जाणार आहे. 

मुलाखत केव्हा आणि कुठे होणार

29 ऑगस्ट 2023 रोजी सकाळी 11 वाजता मुलाखत घेतली जाणार आहे. कै.अरविंद कृष्णाजी पेंडसे सभागृह स्थायी समिती सभागृह तिसरा मजला प्रशासकी इमारत सरसेनानी जनरल अरुण कुमार वैद्य मार्ग ,चंदनवाडी पाचपाखाडी ठाणे या पत्त्यावर ही मुलाखत घेतली जाणार अशी माहिती समोर आली आहे.

Leave a Comment