ZP Bharti 2023 : पुणे जिल्हापरिषदेच्या एक हजार नोकऱ्या; तुम्ही ऑनलाईन अर्ज केला का ?

जिल्हा परिषद आस्थापनेवरील गट क संवर्गामधील राज्यात १९ हजार तर पुणे जिल्हा परिषदेत सरळसेवेने १,००० जागांसाठी पद भरती सुरू झाली आहे.
प्रस्तुत पदे जिल्हा परिषद अधीनस्त असलेल्या विविध विभागांमधील आहेत.

त्यामुळे गट-क मधील विविध संवर्गाच्या हजारो रिक्त पदांकरिता अर्ज दिनांक ५ ऑगस्ट २०२३ पासून सुरू झाले आहेत. २५ ऑगस्ट २०२३ पर्यंत ऑनलाईन अर्ज करायचे आहेत. या माध्यमातून तरुणांना सरकारी नोकरीची संधी उपलब्ध करण्यात आली आहे.

या जागांसाठी भरती सुरु
ग्रामसेवक, आरोग्य पर्यवेक्षक, आरोग्य सेविका, आरोग्य सेवक, स्थापत्य अभियांत्रिकी सहायक, तारतंत्री, विस्तार अधिकारी-कृषी, विस्तार अधिकारी-शिक्षण, विस्तार अधिकारी पंचायत, विस्तार अधिकारी – सांख्यिकी, जोडारी, कनिष्ठ लेखाधिकारी, कनिष्ठ सहायक- लिपिक, कनिष्ठ सहायक लेखा, कनिष्ठ आरेखक, कनिष्ठ अभियंता,

कनिष्ठ अभियंता स्थापत्य, कनिष्ठ अभियंता-विद्युत, कनिष्ठ अभियंता, कनिष्ठ अभियंता यांत्रिकी, यांत्रिकी सहायक, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रयोगशाळा तंत्रज्ञ यांत्रिकी, पशुधन पर्यवेक्षक, औषध निर्माण अधिकारी, रिगमन, वरिष्ठ सहायक- लिपिक, वरिष्ठ सहायक लेखा, लघुलेखक- उच्च श्रेणी, लघुलेखक-निम्न श्रेणी, पर्यवेक्षिका,

Leave a Comment