रेल्वेत नोकरीची सुवर्णसंधी ! भुसावळ विभागात ‘या’ पदाच्या 296 रिक्त जागांसाठी निघाली भरती, 10वी पास उमेदवार राहणार पात्र, पहा डिटेल्स

Central Railway Recruitment 2023 : सरकारी नोकरीच्या शोधात असलेल्या तरुणांसाठी एक अतिशय कामाची आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. ज्या तरुणांना रेल्वेत नोकरी करण्याची इच्छा असेल अशा तरुणांसाठी ही सुवर्णसंधी राहणार आहे. कारण की नुकत्याच काही दिवसांपूर्वी रेल्वे रिक्रुटमेंट सेलने मध्य रेल्वेमध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती आयोजित केली आहे.

यासाठीची अधिसूचना देखील निर्गमित करण्यात आली आहे. तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून या भरतीसाठी अर्ज मागवले जात आहेत. ही भरती एकूण 2409 पदांसाठी होणार असून यामध्ये भुसावळ विभागात तब्बल 296 रिक्त पदे आहेत.

त्यामुळे जर तुम्हीही रेल्वेत नोकरी करू इच्छित असाल तर या भरतीच्या माध्यमातून तुम्ही तुमचे स्वप्न पूर्ण करू शकणार आहात. दरम्यान आज आपण मध्य रेल्वेमध्ये निघालेल्या या भरतीबाबत थोडक्यात माहिती जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत.

कोणत्या आणि किती पदांसाठी होणार भरती

ही भरती शिकाऊ उमेदवारांसाठी केली जाणार आहे. या भरतीच्या अंतर्गत 2409 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. यामध्ये भुसावळ विभागातील रिक्त असलेल्या 296 जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

या पदासाठी दहावी पास आणि संबंधित ट्रेड मधील आयटीआय 50% गुणांसह उत्तीर्ण उमेदवार पात्र राहणार आहेत. मात्र उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.

आवश्यक वयोमर्यादा

या पदासाठी 18 ते 24 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत. रिजर्व कॅटेगिरी मधील उमेदवारांना नियमानुसार सूट दिली जाणार आहे.

निवड कशी होणार

आयटीआय परीक्षेत मिळालेले गुण, कागदपत्रांची पडताळणी आणि वैद्यकीय चाचणी घेतल्यानंतर उमेदवारांची निवड केली जाणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. https://rrccr.com/TradeApp/Login या वेबसाईटवर जाऊन इच्छुक आणि पात्र उमेदवारांना आपला अर्ज सादर करता येणार आहे.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

या भरतीसाठी 28 सप्टेंबर 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. विहित कालावधीनंतर उमेदवारांना अर्ज सादर करता येणार नाही. त्यामुळे विहित कालावधीमध्येच अर्ज करायचा आहे.

Leave a Comment