10वी पास आणि आयटीआय पास उमेदवारांसाठी गुड न्यूज ! महावितरण मध्ये ‘या’ पदासाठी निघाली भरती, इथं अर्ज करा

Mahavitaran Recruitment 2023 : जर तुम्ही दहावी पास आणि आयटीआय उत्तीर्ण असाल तर तुमच्यासाठी एक अतिशय महत्त्वाची आणि गुड न्यूज समोर येत आहे. ती म्हणजे महावितरण मध्ये विविध रिक्त पदांसाठी भरती आयोजित करण्यात आली आहे. महावितरण ने यासाठी नुकतीच अधिसूचना जारी केली आहे.

तसेच इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून भरतीसाठी अर्ज देखील मागवले जात आहेत. त्यामुळे जर तुम्ही या भरतीसाठी पात्र असाल आणि महावितरण मध्ये नोकरी करू इच्छित असाल तर तुम्हाला लवकरात लवकर या भरतीसाठी आपला अर्ज सादर करावा लागणार आहे.

दरम्यान आज आपण महावितरण ने काढलेल्या या भरतीची सविस्तर माहिती थोडक्यात जाणून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. जेणेकरून या भरतीसाठी पात्र उमेदवारांपर्यंत ही माहिती पोहोचेल आणि ते या भरतीत अर्ज करून आपला सहभाग नोंदवू शकतील.

कोणत्या पदांसाठी होणार भरती

वीजतंत्री अप्रेंटिस, तारतंत्री अप्रेंटिस आणि कोपा अप्रेंटिस या तीन पदाच्या रिक्त जागांसाठी ही भरती काढण्यात आली आहे.

किती रिक्त जागांसाठी होणार भरती

अधिसूचनेत दिलेल्या माहितीनुसार, वीजतंत्री अप्रेंटिस या पदाच्या 43, तारतंत्री अप्रेंटिस या पदाच्या 10 आणि कोपा अप्रेंटिस या पदाच्या सहा अशा एकूण 59 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

या पदासाठी दहावी पास उमेदवार आणि संबंधित ट्रेड मधील आयटीआय उत्तीर्ण उमेदवार पात्र राहणार आहेत. मात्र उमेदवारांनी मान्यताप्राप्त शैक्षणिक संस्थेतून शिक्षण घेतलेले असणे आवश्यक आहे.

आवश्यक वयोमर्यादा

या भरतीसाठी 18 ते 38 वर्ष वयोगटातील उमेदवार पात्र राहतील तथापि रिझर्व कॅटेगिरी मधील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादेत सूट दिली जाणार आहे.

नोकरी करण्याचे ठिकाण

या भरती प्रक्रिया अंतर्गत निवड झालेल्या उमेदवारांना भंडारा येथे नोकरी करावे लागणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार

या भरतीसाठी ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. https://www.mahadiscom.in/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन यासाठी अर्ज केला जाऊ शकतो.

अर्ज करण्याची शेवटची दिनांक

या भरतीसाठी कालपासून अर्ज मागविण्यास सुरुवात झाली आहे. यासाठी 30 सप्टेंबर 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे. तथापि उमेदवारांनी विहित मुदतीत अर्ज सादर करणे आवश्यक आहे.

भरतीची जाहिरात कुठे पाहणार

https://drive.google.com/file/d/1ROCFsAev8-7WHylHuuzjbV9d4wk_UuFV/view या लिंक वर या भरतीची सविस्तर जाहिरात पाहता येणार आहे. 

Leave a Comment