10वी पास आहात? ‘या’ विभागात निघाली तब्बल 2500 रिक्त जागांसाठी मेगा भरती, इथं करा अर्ज

ONGC Recruitment 2023 : दहावी पास आणि नोकरीच्या शोधात असणाऱ्या तरुणांसाठी एक अतिशय महत्त्वाची आणि मोठी बातमी समोर येत आहे. खरंतर ही बातमी दहावी पास ते पदवीधर अशा सर्वच उमेदवारांसाठी खास राहणार आहे. कारण की, ओएनजीसी अर्थातच तेल आणि नैसर्गिक वायू महामंडळात नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे.

महामंडळाने नुकत्याच काही दिवसांपूर्वी तब्बल 2500 रिक्त जागांसाठी मेगा भरती आयोजित केली आहे. यासाठीची अधिसूचना महामंडळाकडून निर्गमित झाली असून या भरतीसाठी इच्छुक आणि पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत.

जर तुम्हीही या भरतीसाठी पात्र असाल आणि तुमचीही ओएनजीसी मध्ये नोकरी करण्याची इच्छा असेल तर तुम्हाला यासाठी लवकरात लवकर आपला अर्ज सादर करायचा आहे. दरम्यान आज आम्ही खास तुमच्यासाठी या पदभरती संदर्भात सर्व आवश्यक माहिती घेऊन हजर झालो आहोत. चला तर मग वेळ नाही आवडता जाणून घेऊया या भरतीविषयी सविस्तर.

कोणत्या पदांसाठी निघालीय भरती

पदवीधर अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस आणि टेक्निशियन अप्रेंटिस या पदासाठी ही भरती निघाली आहे.

किती पदांसाठी होणार भरती

या पदभरती अंतर्गत महामंडळात रिक्त असलेल्या 2500 जागा भरल्या जाणार आहेत.

आवश्यक शैक्षणिक पात्रता

या पदांसाठी पदानुसार दहावी पास+आयटीआय, इंजीनियरिंगची पदवी प्राप्त उमेदवार तसेच इतर पदवीधर उमेदवार पात्र राहणार आहेत. शैक्षणिक पात्रतेबाबत अधिक माहिती जाणून घेण्यासाठी एकदा अधिसूचना वाचणे आवश्यक आहे.

वयोमर्यादा

या भरतीसाठी 18 ते 24 वर्षे वयोगटातील उमेदवार पात्र राहणार आहेत. तसेच रिझर्व कॅटेगिरी मधील उमेदवारांना नियमानुसार वयोमर्यादित सुट दिली जाणार आहे.

अर्ज कसा करावा लागणार

यासाठी https://ongcapprentices.ongc.co.in/ongcapp/ या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे. विहित मुदतीत अर्ज करायचा आहे. मुदत संपल्यानंतर अर्ज सादर करता येणार नाही.

अर्ज सादर करण्याची शेवटची दिनांक

या भरतीसाठी 20 सप्टेंबर 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवारांना अर्ज करता येणार आहे.

जाहिरात कुठे पाहणार

https://drive.google.com/file/d/1OiBDfLml0NTILWi71nkMnVHNqUGm1Lt1/view?usp=drivesdk या लिंकवर या भरतीची सविस्तर जाहिरात पाहता येणार आहे.

Leave a Comment